५२ ऑनलाइन सेवांचा प्रयत्न सल्लागाराच्या भरवशावर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नवी मुंबई : अगदी अलीकडे अस्तित्वात आलेल्या वसई विरार, पनवेल महापालिकेला माहिती तंत्रज्ञान विभाग महत्त्वाचा वाटत असला तरी अत्याधुनिक शहराचा कारभार हाकणाऱ्या नवी मुंबई महापालिकेला मात्र या स्वतंत्र विभागाची गरज वाटत नाही. आकृतीबंधातही हा विभाग नसून सल्लागाराच्या भरवशावर काम सुरू असून करोडोंचा खर्च केला जात आहे.
शासकीय, निमशासकीय तसेच खासगी क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान विभागाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नव्याने निर्माण झालेल्या पनवेल महापालिकेसह, पुणे, वसई विरार, ठाणे, कल्याण डोंबिवली, पिंपरी चिंचवड महापालिकेत स्वतंत्र आयटी विभाग निर्माण केला आहे. नवी मुंबई महापालिकेत मात्र तो नाही. ३९९५ पदांचा आकृतीबंध मंजूर झालेला असताना त्यात माहिती तंत्रज्ञान विभागासाठी आवश्यक पदेच मंजूर नाहीत. नवी मुंबई पालिका ५२ ऑनलाइन सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र हा स्वतंत्र विभागच पालिकेत नाही. सल्लागाराच्या भरवशावर काम सुरू आहे.
पालिकेत माहिती तंत्रज्ञानासाठी ‘केपीएमजी’ या सल्लागाराची नेमणूक २०१६ पासून करण्यात आली आहे. लाखो रुपये महिन्याला सल्लागाराला दिले जात आहेत. त्याऐवजी माहिती तंत्रज्ञानतज्ज्ञांची आवश्यक पदे आकृतीबंधात समाविष्ट करून भरली तर कायमस्वरूपी हा विभाग सक्षम होईल. लिडार यंत्रणेद्वारे संपूर्ण नवी मुंबई शहराचे जवळजवळ २० कोटींपेक्षा अधिक खर्चाचे ड्रोनद्वारे सर्व मालमत्तांचे व शहराच्या इत्यंभूत माहितीचे सर्वेक्षण केले जाणार असल्याने या विभागाची गरज आहे. परंतु आता या विभागाचा कारभार ‘केपीएमजी’ या सल्लागाराच्या भरवशावर अवलंबून आहे. माहिती तंत्रज्ञानाचा कारभार शहर अभियंता यांच्याकडील विद्युत विभाग सांभाळत आहे. परंतु आवश्यक सिस्टम मॅनेजर, सिस्टम एनालिस्ट, नेटवर्क इंजिनीअर अशी महत्त्वाची पदे आकृतीबंधातच नाहीत.
महापालिकेत माहिती तंत्रज्ञान विभागासाठी आवश्यक पदांसाठी आकृतीबंधामध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. पालिकेत सॉफ्टवेअर इंजिनीअर भरण्यात येतील. ऑनलाइन सेवा अधिक चांगल्या पद्धतीने देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
-डॉ.रामास्वामी एन., आयुक्त नवी मुंबई महापालिका