माजी मंत्री गणेश नाईक यांचे आश्वासन

पुढील सात वर्षे नवी मुंबईकरांवर कराचा बोझा टाकला जाणार नाही, अशी ग्वाही माजी मंत्री गणेश नाईक यांनी दिली. शिवाय नवी मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसला एकहाती सत्ता नसल्यामुळे आलेल्या अडचणींवर भविष्यात मात करताना आगामी तीन वर्षांत नवी मुंबईच्या विकासाला गती देण्याची रणनीती आखण्यात येईल, असे मतदेखील त्यांनी या वेळी व्यक्त केले.

Proposal to set up a new super specialty hospital in Pune news
पुण्याच्या आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होणार! लवकरच नवीन सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभे राहणार
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
grand alliance government accelerate the shaktipeeth highway work after election victory
निवडणुकीत प्रचंड बहुमत… आता महायुती सरकारकडून शक्तिपीठ महामार्गाला गती?
scheme for unemployed youth promises rs 8500 per month
सत्तेत आल्यास सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा ८५०० रुपये : काँग्रेस
Devendra Fadnavis On Local Body Election
Devendra Fadnavis : आगामी महापालिकेच्या निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “पुढील तीन-चार महिन्यांत…”
chief minister devendra fadnavis governance to speed up government
राज्य चालवावे नेटके…
Olympics to visit India How is the 2036 Games being planned Why are more than one city preferred 
ऑलिम्पिकचे भारतभ्रमण? २०३६ च्या स्पर्धेचे नियोजन कसे? एकापेक्षा अधिक शहरांना का पसंती?
Central government decision farming Relief
दहा वर्षांनंतर शेतकऱ्यांना दिलासा; जाणून घ्या, केंद्र सरकारने २०१४ नंतर पहिल्यांदाच कोणता निर्णय घेतला?

वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात संबोधित करताना माजी मंत्री गणेश नाईक यांनी विविध विषयांवर भाष्य केले.

त्यात आरोग्य, शिक्षण, पाणी, घनकचरा, स्वच्छता या विभागांत चांगल्या दर्जाच्या सेवा देण्याबरोबरच त्यावर होणारा आर्थिक खर्च याकडेदेखील त्यांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. शिवाय आगामी काळात महासभा आणि स्थायी समितीपूर्वी तसेच मनपा पाणीपुरवठा समिती, विधी समिती, महिला बालकल्याण समितीतील सदस्यांशी संवाद साधताना विविध योजनांच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील राहण्याचेही संकेत त्यांनी दिले.

त्याचबरोबर प्रशासन व लोकप्रतिनिधींमधील समन्वय अधिक वाढवताना विकास कामांना गती देण्यात येणार आहे. यासाठी अधिकाऱ्यांच्या अडचणी समजून त्याच्यासोबत शहराच्या विकासात प्रयत्नशील राहण्याचा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला.

याशिवाय नवी मुंबई मनपातील ठेकेदारांचे खच्चीकरण प्रशासनाने करू नये, अन्यथा प्रकल्प मार्गी लावता येणार नाहीत. तसेच नगरसेवकांसह सर्वच पदाधिकाऱ्यांनी आपल्या एका वर्षांच्या कामांचा लेखाजोखादेखील पक्षाकडे सादर करण्यास सांगितले. पक्षाच्या कार्यालयांची प्रभागनिहाय उभारणी करावी, या कार्यालयांच्या माध्यमातून शालेय प्रवेशांसंबंधी पालकांच्या अडचणी सोडविण्यासाठी मदत करावी, तसेच ३.५० लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या रुग्णांना सुपर स्पेशालिटी सुविधा देण्याची मागणीदेखील त्यांनी केली.

Story img Loader