नवी मुंबई: शिंदे गटात १०७ नाही केवळ ३/४ पदाधिकाऱ्यांनी प्रवेश घेतला आहे आणि त्यांनीही आर्थिक हितसंबंधातून हा प्रवेश केला आहे. असा दावा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे बेलापूर अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमवारी शिवसेना शिंदे गटात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील १०७ पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला यावेळी शिवसेना महाराष्ट प्रवक्ते नरेश म्हस्के, उपनेते विजय नाहटा, आणि जिल्हाधिकारी विजय चौगुले यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेवर टिका केली. तर स्थानिक नेतृत्वावर टीका करीत आमची धुसमट होत असल्याने आम्ही शिंदे गटात प्रवेश केल्याचे मनोगत नव्याने दाखल होणारे शहर प्रमुख विजय माने माजी विरोधीपक्ष नेते दिलीप घोडेकर यांनी केले. याला प्रतिउत्तर देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे बेलापूर मतदार संघ प्रमुख विठ्ठल मोरे यांनी आज शिवसेना भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

हेही वाचा… पहिल्या जेएनपीए सेझमध्ये रोजगाराची प्रतीक्षाच? पुढील चार वर्षांत रोजगार मिळणार असल्याची जेएनपीएची माहिती

यावेळी विठ्ठल मोरे यांनी आम्ही पैशापेक्षा निष्ठतेला महत्व देतो, आणि आमच्यातून जे गेले ते आर्थिक हित संबंधातून तिकडे गेले आहेत. कोणाला अटक होण्याची भीती, कोणाला नोकरी जाण्याची भीती तर कोणाला कास पठार परिसरातील हॉटेल बंद होण्याच्या भीतीतून हा प्रकार घडला आहे. शिंदे गटाने दावा केला १०७ पदाधिकारी त्यांच्या कडे गेले मात्र प्रत्यक्षात केवळ ३ ते ४ पदाधिकारी गेले आहेत. त्यामुळे आमच्या पक्षाला खिंडार वैगरे नाही पडले असे विठ्ठल मोरे यांनी सांगितले.

तसेच  २१ जून २०२२ ला शिवसेनेत जी फूट पडली त्यांच्या पैकी ज्यांची हकालपट्टी झाली त्यांच्या समवेत ज्यांचे मधुर संबंध आहेत तेच गेले. राजकारणात पैसे मिळतात म्हणून काम करणाऱ्यांचा हा पक्ष नाही. पैसे घेऊन निष्ठा गहाण ठेवली.  शेवटपर्यंत आमचा गेलेल्या लोकांशी संवाद सुरू होता. जेव्हा हा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी आमच्या चार ते पाच ठिकाणी चौक सभा सुरू होत्या. माझ्यावर आरोप केले. मात्र त्याबाबत त्यांनी अडचणी बाबत संवाद साधला नाही असा दावा मोरे यांनी केला. माझ्यावर वयक्तिक टिका ज्यांनी केली त्याबाबत मला काहीही बोलायचे नाही असा पावित्रा त्यांनी घेतला. 

पत्रकार परिषदेत २२ व्या व्या मजल्यावर बसलेला व्यक्ती गारुडी आहे. तोच हे सर्व करत आहे अशी टीका विठ्ठल मोरे यांनी  नेकदा केली. मात्र त्यांनी शेवटपर्यंत २२ व्या मजल्यावर कोण राहतो याबाबत स्पष्ट बोलणे टाळले. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Not 107 but only 3 to 4 officials have joined the shinde group due to financial interests claim by vitthal more navi mumbaidvr
Show comments