नवी मुंबई : देशाच्या नागरी विमान वाहतूक नियामकांच्या उपस्थितीमध्ये रविवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिले विमान यशस्वीरीत्य उतरल्यानंतर हे विमानतळ सूरु करण्यासाठी लागणाऱ्या परवान्याकडे अदानी एअरपोर्ट होल्डींग लीमीटेड या कंपनीने लक्ष्य केंद्रीत केले आहे. रविवारी झालेल्या लॅंडींगच्या यशस्वी चाचणी ही या प्रकल्पासाठी महत्त्वाचे पाऊल होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इंडिगो एअरलाइन्सच्या ए – ३२० या विमानाने ०८/२६ या धावपट्टीवर यशस्वी लँडिंग केल्याच्या घटनेवेळी विमानातून १४ कर्मचारी आणि ७ विविध विभागांचे अधिकारी उतरले. यामध्ये नागरी विमान वाहतूक महासंचालनालय, विमानतळ प्राधिकरण, सीमाशुल्क विभाग, इमिग्रेशन, केंद्रीय औद्योगिक सूरक्षा फोर्स, हवामानशास्त्र विभाग, नागरी विमान वाहतूक सूरक्षा विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ही चाचणी यशस्वी ठरल्याने पुढील परवान्यापूर्वी आणि परवाना मिळण्यासाठी कराव्या लागणाऱ्या चाचण्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा – उरण : बाह्यवळणचा ‘मार्ग मोकळा’, उरण बायपास मार्ग नव्या वर्षात कार्यान्वित होण्याची शक्यता

फ्लाइट व्हॅलिडेशन चाचणीने एनएमआयए या कंपनीच्या कार्यक्षमतेची सिद्धता प्रमाणित केली. मागील तीन वर्षांपासून दिवसरात्र हजारो कामगार हा विमानतळ प्रकल्प पूर्ण करण्यासाठी झटत आहेत. यामुळेच आतापर्यंत विमानतळाच्या धावपट्टी आणि इतर यंत्रणेचे तांत्रिक मूल्यमापन, विमान धावपट्टीवर उतरण्यावेळी वैमानिकांना मिळणारे सांकेतिक संदेश यांच्या चाचण्या यशस्वी झाल्याने नागरी हवाई वाहतूक प्राधिकरणाकडून अहवालाच्या मूल्यांकनावरुन एनएमआयएला विमानतळ संचलनाचा परवाना मिळण्यास मदत होणार आहे. हा परवाना मिळाल्यानंतर एनएमआयएच्या उड्डाण प्रक्रियेचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशनासाठी इलेक्ट्रॉनिक एरोनॉटिकल इन्फॉर्मेशन पब्लिकेशनमध्ये समावेश केल्यानंतर ‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ हे आंतरराष्ट्रीय स्तरावर गणले जाणार आहे.

पनवेल तालुक्यातील गावांच्या जमिनींचे भूसंपादन करुन जमीन, खाडीक्षेत्र, डोंगर यांवर हे विमानतळ बांधल्याने याला ग्रीनफील्ड विमानतळ बोलले जाते. एनएमआयए ही कंपनी विमानतळ प्रकल्पाच्या डिझाइन, बांधकाम, संचालन आणि देखभालीसाठी स्थापन केली आहे. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडच्या मालकीच्या एनएमआयएएलची ७४ टक्यांची तर आणि सिडको मंडळाची २६ टक्यांची हिस्सेदारीचा हा प्रकल्प आहे. चार टर्मिनल या प्रकल्पात असून या सर्व टर्मिनलचे काम पूर्ण झाल्यावर दरवर्षी ९ करोड प्रवासी आणि ८ लाख मेट्रिक टन मालवाहतुकीची हाताळणी या विमानतळातून होईल.

हेही वाचा – नवी मुंबई : टी.एस. चाणक्य तलावात फ्लेमिंगोंचे आगमन

एनएमआयएसाठी रविवार (२९ डिसेंबर) हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. फ्लाइट व्हॅलिडेशन यशस्वी होणे हे एक मोठे पाऊल आहे आणि आम्ही विमानतळ कार्यान्वित करण्याच्या दिशेने आणखी जवळ आलो आहोत. प्रत्येक टप्प्यावर सुरक्षा प्राधान्य आहे. डीजीसीए आणि इतर सर्व एजन्सींना त्यांच्या सहकार्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. – अरुण बन्सल, मुख्य कार्यकारी अधिकारी, अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड