नवी मुंबई : एनआरआय पोलीस ठाणे हद्दीत करावे येथे राहणाऱ्या नुरिया उर्फ गणा बाबुल पठाण याच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र सदर आरोपी बाबत दहशदवाद विरोधी पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती. त्या अनुशंघाने त्याची चौकशी केली असता तो मूळ बांग्लादेशी नागरिक असून बेकायदा भारतात वास्तव्य करीत असल्याचे लक्षात आले.
बबुल मजीद पठाण वय ६० आणि परवीन पठाण या मूळ बांगलादेशी दाम्पत्याचा नुरिया हा मुलगा. तो आई वडिलांच्या समवेत १९९५ मध्ये वैध पारपत्रशिवाय भारतात आला. तेव्हापासून आज तागायाद तो जुने मच्छीमार्केट करावे परिसरात राहतो. सध्या सी-वूड येथे भाजी विक्री आणि मच्छीमारिचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतो. धक्कादायाब बाब म्हणजे त्याच्या कडे भारतीय नागरिक असल्याचा पुरावा असलेले आधारकार्ड आणि पँन कार्ड हि आहे. बनावट कागदपत्राच्या आधारे त्याने हे बनवून घेतलेले आहे. तो स्वतः मोबाईल क्रमांकावरून आपल्या बांगलादेशी नातेवाईकांशी संवाद साधत होता. सध्या त्याचे आई वडील पुन्हा बांगलादेशात गेले असण्याची शक्यता आहे.