नवी मुंबईत सोमवार १९ सप्टेंबरला ओ.बी.सी कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे सदर कार्यक्रमास राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती शनिवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
हेही वाचा >>> उरण : जोरदार पावसाचा भात शेतीला फटका ; शेतकरी चिंताग्रस्त
ओबीसीचे आरक्षण पूर्ववत मिळवून दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल नवी मुंबई व पनवेल शहर पदाधिकारी कार्यकर्ते व विविध घटकातील ओबीसी बांधवांच्या तर्फे “कृतज्ञता सोहळा” आयोजित करण्यात येणार आहे. अशी माहिती नवी मुंबई राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी दिली. सदर मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून ओबीसी नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड आदिती तटकरे , शशिकांत शिंदे, रोहत पवार आनंद परांजपे राज्य ओबीडी सेल प्रदेशाध्यक्ष महेश तपासे आदी उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषद हि नवी मुंबई ओबीसी सेलचे अध्यक्ष रुपेश ठाकूर यांनी केली होती तर यावेळी पनवेल शार अध्यक्ष राजू मुलांनी संपर्क प्रमुख प्रशांत पाटील उपस्थित होते.
हेही वाचा >>> नवी मुंबई : भाज्यांचे दर वाढल्याने गृहिणींची आर्थिक कोंडी
नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी यावेळी सांगितले कि ओबीसी समाजाला आरक्षण मिळू न देण्याचा प्रयत्न विविध मार्गांनी केला गेला मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रयत्नांनी मिळवून दिले. त्यांच्या प्रति कृतज्ञता म्हणून महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलच्या मार्गदर्शखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.