लोकसत्ता टीम

पनवेल : खारघर वसाहतीमध्ये मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता एका जेष्ठ नागरिकाला पोलिसांची नाकाबंदी पुढे सुरु असल्याची सबब देऊन दीड लाखांना लुटले. खारघर वसाहतीमधील सेक्टर २१ येथील तिरुमाला सोसायटीत राहणारे ७९ वर्षीय किसन सोमकुवर हे चिंतामनी सोसायटी पायी चालत असताना त्यांना एका व्यक्तीने स्वतः पोलीस असल्याची ओळख सांगून फसवणूक केली.

आणखी वाचा-चिपळे ते वावंजे रस्ता रुंदीकरणाअभावी अपघातांचे सत्र सूरुच; दोन अपघातांमध्ये एक महिलेचा मृत्यू तर तीघे जखमी 

भामट्या व्यक्तीने सोमकुवर यांना परिसरात पोलीसांची नाकाबंदी सुरु असून तुमच्या जवळील सोन्याचांदीचे दागीने काढून खिशात ठेवा असे सांगितले. तसेच हे दागिने ठेवण्यासाठी रुमालात गुंडाळून देण्याचा बहाणा करुन हातचलाखीने सोमकुवर यांचे दिड लाखांचे दागिने लुटले. खारघर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून पोलीस भामट्याचा शोध घेत आहेत.

Story img Loader