नवी मुंबई: वाशी सेक्टर १२ येथील नवी मुंबई महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या बस स्थानक, वाणिज्य संकुल आणि आंतरक्रीडा संकुल तसेच ऑलिंपिक आकाराच्या जलतरण तलाव प्रकल्पाचे ४२%काम झाले असून येत्या ८ महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन आहे.वाशी से.१२ याठिकाणी बस स्थानक, वाणिज्य संकुल, आंतरक्रीडा संकुल व ऑलिम्पिक दर्जाचा तरण तलाव विकसित करण्याचे काम सुरु झाले असून तळमजला अधिक ८ मजले उंच अशी ही इमारत वर्षा अखेर पूर्ण उद्दिष्ट आहे. याठिकाणी सद्यस्थितीत ४२% काम पुर्ण झाले आहे. आमदार गणेश नाईक यांनी या बहुउद्देशीय इमारतिची पाहणी केली असून हे नवी नवी मुंबईसाठी आयकॉनिक ठरेल असे मत व्यक्त केले.

या इमारतीत तळमजल्यावर बस स्थानक, विद्युत वाहन केंद्र, एनएमएमटी कंट्रोल रूम, स्पेअरपार्ट्स, स्टोरेज रूम, फुडकोर्ट, मलप्रक्रिया केंद्र, रेन वॉटर हार्वेस्टींग टँक अशा प्रकारची व्यवस्था आहे. याशिवाय पहिला, दुसरा, तिसरा मजल्यावरील काही भागात चार चाकी व दुचाकी वाहनतळाची व्यवस्था, तिसऱ्या मजल्याच्या उर्वरीत भागात स्पोर्ट्स हॉल, योगा रूम अशा सुविधा उपलब्ध असणार आहेत. चौथ्या मजल्यावर ऑलिम्पिक आकाराचा मोठा तरणतलाव असणार आहे. तरणतलावाच्या पाण्याचे शुध्दीकरण करण्याकरिता क्लोरिनसह ओझोनाईझ तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून ते शरीरास अपायकारक नाही. चौथ्या मजल्यावरील उर्वरित भागात कॅफेटेरिया, जीम, मेडिटेशन सुविधा, प्रथमोपचार कक्ष, कॉस्च्युम रुम, व्हिआयपी लाँज, डेक एरिया, शॉवर रुम, मसाज रुम, लॉकर, चेंजींग रुम व प्रसाधनगृहाची व्यवस्था असणार आहे. या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आंतरक्रीडा कक्ष, योग कक्ष, मिडिया रुम, स्पोर्ट्स हॉल असून सहाव्या व सातव्या मजल्यावर एनएमएमटी कार्यालये तसेच ८व्या मजल्यावर बँक्वेट हॉलची व्यवस्था आहे. त्याचप्रमाणे छतावर ऑनग्रीड सोलरपॅनल बसविण्यात येणार असून त्यामधून साधारणत: १८८ किलो वॅट वीज निर्मिती होऊन या इमारतीच्या वीज खर्चात बचत होणार आहे.

Story img Loader