उरण: कडापे-वशेणी येथील डोंगरात अज्ञात समाजकंटकांनी शुक्रवारी रात्री आग लावल्याने वणवा लावला होता. त्यामुळे प्रचंड आग पसरली होती. हा वणवा विझवण्यासाठी चिरनेरच्या फ्रेंड्स ऑफ नेचर(फॉन) संस्थेच्या कार्यकर्ते तसेच राकेश शिंदे व हृषिकेश म्हात्रे यांनी प्रयत्न केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन ही आग विझवण्यास मदत केली. या वणव्यामुळे मोठ्या प्रमाणात जंगलांचा नाश होत असून अनेक पक्षी, त्यांची घरटी, अंडी, लहान जीव, कीटक, सरपटणारे प्राणी नष्ट होऊन पर्यावरणाला धोका पोहचत असल्याने ग्रामस्थांनी जंगलात वणवा लागू नये आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) चिरनेर उरण रायगड तर्फे ग्रामस्थांना केले आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On friday night unidentified people set a fire in the mountains of kadape vasheni in uran dvr