शुक्रवार व शनिवारी सायन पनवेल महामार्गावर वाशी टोलनाक्यावर वाहतूक कोंडी पाहायला मिळते.मुंबईहून लोणावळा व पुण्याच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहने जात असल्यामुळे वाशी उड्डाणपुलावर वाहनांची गर्दी होते.त्यातच दिवसभर पावसाची रिपरिप सुरु असल्यामुळं मानखुर्द पासून वाशी टोलनाक्यावर वाहनांची गर्दी झाली आहे या परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी पाहायला मिळते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> सिडकोच्या उरण मधील प्रस्तावित लॉजिस्टिक पार्कसाठी संमतीने जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध कायम

वाशी टोलनाक्यावर गणपती उत्सवानंतर वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी होते.परंतु शहरात मागील दोन तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे उड्डाणपुलावर वाहतूक संथगतीने सुरु आहे. मानखुर्द ते वाशी टोननाक्यावर वाहनांची प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची माहिती माधव पवार यांनी दिली .या मार्गावर नेहमीच सकाळी सायंकाळच्यावेळी नेहमी गर्दी पाहायला मिळते. टोलनाक्यावर प्रचंड गर्दीमुळे नवी मुंबई वाहतूक विभागामार्फत वाहतूककोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलीस सज्ज आहेत.