पनवेल: यंदाचा अर्थसंकल्प साजरा करताना पनवेल पालिकेच्या आयुक्तांनी यंदाच्या वर्षात पनवेलकरांच्या आरोग्यसाठी विशेष लक्ष दिले जाईल असे आश्वासन दिले होते. याच आश्वासन पूर्तीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात शहरी व ग्रामीण लोकवस्तींमध्ये १२ आरोग्य वर्धिनी केंद्र व उप केंद्र सूरु करण्यात आली आहेत.

पालिकेने स्वातंत्र्यदिनी मंगळवारी सकाळी खांदेश्वर, कामोठे व कळंबोलीतील नागरिकांना नवे तीन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांची भेट दिली. कामोठे वसाहतीमध्ये सेक्टर २२, खांदेश्वर वसाहतीमधील सेक्टर नऊ आणि कळंबोली येथील प्रभाग कार्यालयात ह्या नवीन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे उदघाटन मंगळवारी सकाळी पालिका आयुक्त गणेश देशमुख आणि भाजपचे पनवेलचे आ. प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालिकेचे कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

nashik police
नाशिक: सिडकोत पोलीस संचलन
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Absence of doctors other staff at Aarey hospital beds Tribal patients suffering for treatment Mumbai print news
आरे रुग्णालय रुग्णशय्येवर डॉक्टर, अन्य कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती; आदिवासी रुग्णांची उपचारांसाठी पायपीट
pune Arogya sena
औषधांच्या किमती नियंत्रणात आणा, आरोग्य व्यवस्था सक्षम करा! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेनेकडून खुला जाहीरनामा
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
special fund of 20 lakhs each to all departmental offices of Mumbai Municipal Corporation
सुविधांसाठी पालिकेचे पाच कोटी, पालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांना प्रत्येकी २० लाखांचा विशेष निधी
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड

पालिका क्षेत्रात २० हून अधिक नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रातून आरोग्य सेवा दिली जाण्याचे पालिकेचे नियोजन आहे. त्यापैकी १५ आरोग्य वर्धिनी केंद्र पालिकेने आतापर्यंत सूरु केली आहे. पालिका क्षेत्रातील रोहिंजन सारख्या गावात सुद्धा पालिकेने दवाखाना सूरु केला आहे. खारघर येथे आपला दवाखाना पालिकेने सूरु केला आहे. या दवाखान्यातून दिवसाला तीनशेहून अधिक रुग्णांना बाह्य रुग्ण सेवा दिली जाते.

हेही वाचा… ५ कोटी ४१ लाख रुपयांचा ऐवज पुन्हा मूळ मालकांच्या ताब्यात; ‘या’ गोष्टींचा समावेश

रात्री उशीरापर्यंत रुग्णसेवा मिळत असल्याने पालिकेच्या दवाखाने आणि नागरि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येणा-या रुग्णांचा कल वाढत असल्याची माहिती पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी दिली. पालिकेचे आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी काही दिवसांत तळोजा औद्योगिक वसाहतीमधील तोंडरे गाव आणि तळोजा वसाहतीमधील सिडकोच्या गाळ्यांमध्ये उपलब्ध झाली असून तेथेही पालिका दवाखाना सूरु करत असल्याचे सांगितले.

हेही वाचा… गणेशमूर्तीकारांची नगरी पेण मध्ये पर्यावरणस्नेही मूर्तींना मागणी; कागदाच्या लगद्यापासून मूर्ती

आरोग्य सेवा मजबूत करण्यासोबत पालिकेने शहर स्वच्छतेसाठी आधुनिक यंत्रांचा वापर जोरदार सूरु केला आहे. मंगळवारी स्वतंत्र्यदिनी पालिकेने मुख्यालय इमारतीमधील मैदानात ध्वजारोहनाचा कार्यक्रम आटोपल्यावर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पालिकेने स्वच्छतेसाठी खरेदी केलेल्या जेटींग, रोबींग आणि ग्रॅबींग यंत्राच्या नव्या सहा वाहनांचे उदघाटन करुन ही सहा वाहने आजपासून सेवेत दाखल केली. एक यंत्र ३५ लाख रुपये आणि सूमारे चार कोटी रुपये वर्षाला या यंत्रांची देखभालीसाठी पालिका खर्च करणार असल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त पवार यांनी दिली.