लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नवी मुंबई : पनवेल येथील कर्नाळा अॅकॅडमी मैदानात बागेश्वरधाम सरकार धिरेंद्र कृष्णा शास्त्री यांचे श्रीराम कथा सत्संग कार्यक्रमाचे आयोजन १० जानेवारी आणि ११ जानेवारीला करण्यात आले आहे. या सत्संग कार्यक्रमाकरीता मोठ्या प्रमाणात जनसमुदाय येण्याची शक्यता असल्याने येणाऱ्या भाविकांच्या सोयीकरिता पनवेल ठाणा नाका ते जेएनपीटी रोडला जोडणारा रस्ता जाण्या-येण्याकरिता प्रवेशबंदी घोषित करून मार्ग बदल करण्यात आला आहे.
बागेश्वर शास्त्री यांचा सत्संग कार्यक्रम १० आणि ११ जानेवारीला कर्नाळा स्पोर्ट्स मैदानात आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला होणारी गर्दी पाहता वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. वाहतूक कोंडी न होता शिस्तबद्ध वाहतूक व्हावी यासाठी मार्गबदल करण्यात आले आहेत. त्यानुसार पनवेल ठाणा नाका ते जेएनपीटी रस्त्याला जोडणारा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांकरीता १० आणि ११ जानेवारीला बंद ठेवण्यात येणार आहे.
आणखी वाचा-उरण-खारकोपर लोकलचे पंतप्रधानांच्या हस्ते होणार ‘रिमोट’द्वारे उद्घाटन
ठाणा नाका – खांदा कॉलनी उड्डाणपुल-कळंबोली सर्कल मार्गे इच्छित स्थळी जातील. पर्याय दोन नुसार ठाणा नाका- खांदा कॉलनी सिग्नल डावीकडून छोटा खांदा गाव – रेल्वे ओव्हर ब्रिज बाजुने जेएनपीटी रोड मार्गे इच्छित स्थळी जातील.
जेएनपीटी कडून येण्याकरीता पर्यायी मार्ग
कळंबोली सर्कल खांदा कॉलनी- गार्डन हॉटेल सिग्नल मार्गे इच्छीत स्थळी जातील. सदरची अधिसुचना दुध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, औषधे व भाजीपाला इत्यादी जिवनावश्यक वस्तु वाहुन नेणारी वाहने वगळून तसेच अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका व आत्यावश्यक सेवेतील सर्व वाहनांना लागु असणार नाही.