पनवेल : चोरी केल्याची बातमी समजताच आपल्या कामगारांच्या मदतीने संशयीत चोराला गाळ्यात आणून त्याला मारहाण केली याच मारहाणीत एकाला प्राण गमवावे लागले. खारघर पोलीसांनी या प्रकरणी तीघांना अटक केली आहे. खारघर वसाहतीमध्ये दोन दिवसांपूर्वी सेक्टर १२ मधील एका गाळ्यामध्ये लोखंडी वस्तू चोरी झाली होती. या गाळ्याचे मालक आणि त्यांच्याकडे काम करणारे कर्मचारी संशयीत चोरांचा शोध घेत होते. त्या कर्मचा-यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अनिल जाधव आणि विनोद राठोड या दोन संशयीत चोरांना पकडून गाळ्यात आणले. त्यांना मारहाण केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याच जबर मारहाणीत संशयीत चोरापैकी विनोद यांचा मृत्यू झाला. पोलीसांनी माहिती मिळाल्यावर खारघरचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजीव शेजवळ यांच्या पथकाने सेक्टर १२ येथील ओमशांती निवास हा गाळा गाठला. विनोद राठोड याचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले आहे. पोलीसांनी या प्रकरणी तीघांना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक शेजवळ यांनी दिली. या प्रकरणी मारहाणीत गाळे मालकाने कामगारांसोबत मारहाणीत मदत केल्याने त्यांना सुद्धा पोलीसांनी अटक केली आहे. संशयीत चोराला पकडून परस्पर शिक्षा दिल्याने सर्वांनाच पोलीस कोठडीत बसावे लागले आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One died after being beaten up as a thief an incident in kharghar ysh
Show comments