नवी मुंबई :- नवी मुंबईतील तुर्भे गावातील सामंत विद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये शाळेच्या वेळेत वाद झाला. शाळा सुटल्यावर या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि दुर्दैवाने त्यात एका १७ वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर अन्य एक गंभीर जखमी आहे. या प्रकरणी सात ते आठ विद्यार्थी ताब्यात घेतले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या घटनेत आदित्य भोसले याचा दुर्दैवी अंत झाला आहे तर देवांग ठाकूर हा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हे दोघेही सामंत विद्यालयात १२ वीला शिकत आहेत.भोसले आणि त्याच्या वर्गातील काही विद्यार्थ्यांचे वाद सुरूच होते. हे वाद काही वेळापुरता शमवण्यात आला मात्र आज (बुधवारी)  शाळा सुटल्यावर १२च्या सुमारास नजीकच्या मैदानात हा वाद पुन्हा उफाळून आल्याने आपापसात जोरदार भांडण आणि त्यानंतर हाणामारी झाली. ही हाणामारी  एवढी भीषण होती की त्यात आदित्य भोसले आणि देवांग ठाकूर हे गंभीर जखमी झाले.  जखमी वर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना भोसले याला मृत घोषित केले तर ठाकूर याच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत. घटना घडल्यावर . एपीएमसी पोलीस व गुन्हे शाखा कक्ष १ ने घटनास्थळी धाव घेतली असून पाच ते सहा विद्यार्थ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सदर घटनेचा तपास हा एपीएमसी पोलीस ठाणे व गुन्हे शाखा कक्ष एक समांतर रित्या करत आहेत. अशी माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One killed and one injured in a brawl between minors at samant school navi mumbai amy