नवी मुंबई : पाम बीच मार्गावर गुरुवारी पहाटे झालेल्या अपघातात एक जण ठार झाला असून दोन जण गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. एका कारला पाठीमागून येणाऱ्या भरधाव जीपने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात मनीष पेडणेकर (वय ४०) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी स्नेहा आणि मुलगी अनन्या गंभीर जखमी झाले आहेत. दोघींवरही वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. अपघात झाल्यानंतर वाहनचालक पळून गेला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन नंतर त्याला अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दिघा येथील रहिवासी मनीष पेडणेकर हे पत्नी स्नेहा आणि चार वर्षीय मुलगी अनन्या यांच्यासह गुरुवारी पहाटेच्या सुमारास कारने निघाले होते. नेरुळ येथील सारसोळे चौकात पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या जीपने पेडणेकर यांच्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. अपघात झाल्यानंतर जीपच्या क्रमांकावरून पोलिसांनी वाहन मालकाचा शोध घेतला. तेव्हा वाहन ओंकार मोरे चालवत असल्याची बाब समोर आली.

हे ही वाचा… पनवेलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत फूट

पोलिसांनी ओंकार मोरे याला अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता ९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. वाहनचालक मोरे याने मद्या प्राशन केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. मात्र वैद्याकीय अहवाल आल्यावर नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांनी दिली.