नवी मुंबई : रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास शीव पनवेल मार्गावर झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.या प्रकरणी अपघात नंतर पळून गेलेल्या डंपर चालकाचा शोध सुरू आहे.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवाजी लेंढाळ असे या अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शीव पनवेल मार्ग मुंबई दिशेच्या मार्गिकेवर जुई नगर रेल्वे स्टेशन नजीक हा अपघात झाला. सुपारी साडे तीनच्या दरम्यान भरधाव वेगाने मुंबई कडे जाणाऱ्या डंपर चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटले त्याने गाडी समोरील एका कारला जोरदार धडक दिली. त्याकार ने त्याच्या समोरील कारला धडक दिली अशाच पद्धतीने चार चार आणि दोन दुचाकी पाठोपाठ धडक बसली. यात दुचाकी चालक शिवाजी 

लेंढाळ यांचा मृत्यू झाला. अपघातात सर्व गाड्यांचे कमी जास्त नुकसान झाले आहे. अपघात होताच डंपर चालक गाडीतून उडी मारून पळून गेला. त्याचा शोध सुरू आहे. अशी माहिती नेरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांनी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One killed in accident in navi mumbai amy