नवी मुंबईतील घणसोली नोडमध्ये दोन गटांच्या हाणामारीत एकाचा मृत्यू तर दोन अत्यवस्थ झाल्याची घटना घडली आहे. आरोपीनेच दिलेल्या फिर्यादीवरून मयत व्यक्ती व त्याच्या साथीदारांच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. यात दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. नासीर शेख असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याच्या गटातील साबीर राजू, नासीर शहा यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच याच गटातील अन्य तीन आरोपी फरार आहे. तर दुसऱ्या बाजूला नासिर शेख, मोहम्मद अली, सलमान खान यांच्या गटातील तीन आरोपी फरार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- नवी मुंबई : २ लाखांची लाच स्वीकारल्याप्रकरणी तहसीलदारसह एजंटवर कारवाई

शनिवारी सकाळी घणसोली येथील दर्गा परिसरात दोन्हीतील काही जण एका पानटपरी जवळ उभे होते. त्यात मयत नासीरच्या गटातील बंटी उर्फ नितीन याने सिगारेट पिऊन टाकलेले थोतुक साबीरच्या गटातील काही लोकांच्या पायात पडले. यातून सुरुवातीला दोघात वाद झाला. त्यानंतर साबीरच्या गटातील लोकांनी नितीनला मारहाण केली. ही घटना सकाळी अकराच्या सुमारास पडली. रात्री साडे नऊ दहाच्या सुमारास या परिसरात नासीर असल्याची माहिती साबीर गटाला कळली. तेही लोक जमा झाले व दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. यात नासीर शेखवर सबीरने चाकूने वार केले. हल्ल्यानंतर नासीरला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मात्र, हाणामारीत नासीरनेही साबीरला बेदम मारहाण केली. त्यात साबीर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. यातील दोन्ही गटातील एकूण सहा आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी दिली.