उरण : गुरुवारी सकाळी १० वाजता जुईनगर वरून खोपटे कोप्रोली मार्गावरून जाणाऱ्या इलेक्ट्रिक बस वरील ताबा सुटल्याने रस्त्यातील तीन दुचाकीस्वार व एका टेम्पोला जोरदार धडक दिली. या मध्ये खोपटे येथील दुचाकीस्वार निलेश शशिकांत म्हात्रे याचा मृत्यु झाला आहे.

हेही वाचा >>> पनवेलमध्ये १५६ कोटींची रस्त्यांची कामे; कळंबोली, खारघर, कामोठे, पनवेल शहर,तोंडरे येथील रस्त्यांचा समावेश

या घटनेमुळे संतप्त झालेल्या खोपटे येथील नागरिकांनी अपघातग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबाला मदत आणि बेदरकार पणे चालविण्यात येणारी एन एम एम टी बस सेवाच बंद करावी अशी मागणी सुरू केली आहे. हा अपघात इतका भयंकर होता बस मुख्य मार्ग सोडून रस्त्याशेजारील दुकानात शिरण्याची शक्यता होती. या घटनेनंतर उरण व वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. संतप्त जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत. तर नागरिकांच्या मागणीनुसार एन एम एम टी च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चर्चेसाठी वाट पाहत आहेत. मागील तीन तासांपासून रस्ता रोको सुरू आहे.

Story img Loader