उरण: येत्या गणेशोत्सवापूर्वी उरण – पनवेल महामार्गावरील जासई उड्डाणपूलाची एक मार्गिका सुरू करण्यात येणार आहे. या पुलाच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण झाले असून पुलावरील वाहन भार(वजन क्षमता) चाचणी करून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण(एन एच आय)ने दिली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार आहे.

मागील नऊ वर्षांपासून रखडलेल्या उरण पनवेल राष्ट्रीय महामार्गा वरील जासई उड्डाणपूलाच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण करून यातील दोन मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येणार आहेत. त्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण(एन एच आय) कडून अंतिम चाचणी शिल्लक आहे.

oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
mumbai lhb coaches train
कोकण मार्गावरील एक्सप्रेसला जोडले जाणार एलएचबी डबे, प्रवाशांच्या सुरक्षेत होणार भर
Easy fight for Vijay Wadettiwar in Bramhapuri assembly election 2024
ब्रम्हपुरीत विजय वडेट्टीवार यांच्यासाठी सोपी लढत!
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त

हेही वाचा… उरण मध्ये गुरुवारी पावसाला सुरुवात, जोर मात्र कमीच; नागरिकांची अनेक दिवसांच्या उकाड्यापासून सुटका

पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असतांना पावसाने हजेरी लावल्याने पुलावरील डांबरीकरणाचे काम थांबले होते. मात्र पावसाने उसंत घेतल्याने पुन्हा एकदा जासई उड्डाणपूलाचे उर्वरीत काम पूर्ण करण्यात आले आहे. पुलावरील एका भागाचे काम पूर्ण झाले असून यात दोन मार्गिका तयार करून हा पूल येत्या आठवड्यात वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येईल अशी माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण(एनएचआय) चे सहव्यवस्थापक यशवंत घोटकर यांनी दिली आहे.

हेही वाचा… नवी मुंबईत दहीहंडीचा उत्साह; शहरात ५० सार्वजनिक दहीहंडीचे आयोजन,पोलिसांची चोख व्यवस्था

जासई उड्डाणपूल महत्वाचा: उरण पनवेल या राष्ट्रीय महामार्गावरील जासई उड्डाणपूल हा उरण मधील तसेच उरण परिसरात ये जा करणाऱ्या प्रवासी व नागरीकांसाठी महत्वाचा आहे. मात्र येथील मार्गाच्या रुंदीकरणाचे काम मागील नऊ वर्षांपासून रखडल्याने नागरीक आणि प्रवाशांना नियमितपणे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता.