नवी मुंबई: तुर्भे एमआयडीसीतील डी ३५० भूखंडावरील एका इमारतीलाचे पाडकाम सुरू होते. त्यात अचानक इमारतीचा एक मोठा भाग निखळून खाली पडला. दुर्दैनाने त्याखाली दोन कामगार दबले गेले. त्यांना बाहेर काढण्यात आले मात्र त्यातील एकाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला.
अमीनुल रियाजुद्दीन हक (वय २० वर्ष राहणार फरीदपूर पोस्ट कार्बोना ठाणा मालदा पश्चिम बंगाल) असे मयत युवकाचे नाव आहे. तुर्भे परिसरातील बगाडे कंपनी कांचन बिल्डिंग डी ३५० तुर्भे ही इमारत तोडण्याचे काम सुरु होते. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास इमारतीचा एक भाग कोसळून खाली पडला. याच जागी काम करणारे दोन कामगार ढिगार्याखाली दबून जखमी झाले. त्यांना बाहेर काढण्यात आले व उपचार करता महानगरपालिका रुग्णालय, वाशी येथे तीनच्या सुमारास नेण्यात आले. डॉक्टरांनी दोन कामगारांपैकी अमीनुल रियाजुद्दीन हक कामगार मयत झाल्याचे सांगितले व दुसऱ्या कामगारास मार लागल्याने आंतरुग्ण दाखल करण्यात आले.
हेही वाचा… हार्बर मार्गावरील लोकल प्रवाशांसाठी मध्यरात्री एनएमएमटी बसच्या ३२ फे-या
या बाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. घटनेत हलगर्जीपणा आढळून आल्यास संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात येईल . अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी दिली.