नवी मुंबई: एपीएमसी बाजारात सध्या पावसामुळे ग्राहक रोडावले आहेत. त्यामुळे बाजारात कांद्याच्या दरात घसरण होत आहेत. तरीदेखील किरकोळ बाजारात कांद्याची दुप्पट दराने विक्री होत आहे. एपीएमसी घाऊक बाजारात प्रतिकिलो कांदा १०-१६ रुपयांनी विक्री होत आहे, किरकोळ बाजारात मात्र प्रतिकिलो २५-३० रुपये अशा दुप्पट दराने विक्री होत आहे.

यावर्षी अवकाळी पावसाने कांद्याचा दर्जा घसरला आहे. बाजारात केवळ २०% उत्तम दर्जाचा कांदा दाखल होत आहे. त्यामुळे बाजारात उच्चतम कांद्याला अधिक मागणी असल्याने दर वधारत होते. मात्र मागील आठवड्यापासून एपीएमसीत कांद्याचे दर कमी झाले आहेत.

Traders reported that price of coriander decreased compared to last week and price of fenugreek is on rise
कोथिंबिरेच्या दरात घट; मेथी तेजीत, फळभाज्यांचे दर स्थिर
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
ऑक्टोबरमध्ये निर्यातीत १७.२५ टक्के वाढ
ऑक्टोबरमध्ये निर्यातीत १७.२५ टक्के वाढ
rupee falls 4 paise to close at all time low of 84 43 against us dollar
रुपया ८४.४३ च्या गाळात!
wpi inflation hits 4 month high in october on rising food prices
भाज्यांमधील किंमतवाढ ६३.०४ टक्क्यांवर; घाऊक महागाई दराचाही चार महिन्यांतील सर्वोच्च स्तर
loksatta analysis global foods mnc s selling less healthy products in India
बहुराष्ट्रीय खाद्य उत्पादक कंपन्या भारतात हलक्या प्रतीची उत्पादने विकतात? काय सांगतो नवा अहवाल?
onion shortage Mumbai
शंभरी गाठलेल्या कांद्यामुळे ग्राहक जेरीस, जाणून घ्या, शेतकऱ्यांना किती दर मिळतो, ग्राहकांना किती रुपये मोजावे लागतात

हेही वाचा… उरण :भर पावसात एनएमएमटी नादुरुस्त; प्रवाशांचे हाल

प्रतिकिलो उच्चतम प्रतिचा कांदा १८-२२रुपयांनी कांदा विक्री होत होता. परंतु आता दर कमी झाले आहेत, प्रतिकिलो कांदा कमीत कमी १० रुपये तर जास्तीत जास्त १६ रुपयांनी विक्री होत आहे. घाऊक बाजारात दर उतरले असताना देखील किरकोळीत मात्र २५-३०रुपयांनी विकले जात आहेत.

लसणाच्या दरात १०-२० रुपयांनी घसरण

एपीएमसी बाजारात सध्या पावसामुळे आणि श्रावण महिना सुरु झाल्याने लसणाची विक्री कमी होत आहे. तसेच बाजारात व्यापाऱ्यांकडे शिल्लक लसुण असल्याने प्रतिकिलो दरात १०-२०रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे आधी एपीएमसीत उटी लसूण १४५-१८०रुपयांनी विक्री होत होता तो आता १४०- १६० रुपयांनी आणि देशी लसूण १२०-१५०रुपयांवरून १२०-१४०रुपयांनी विक्री होत आहे.