एपीएमसी बाजारात सोमवारी कांद्याच्या तब्बल १५० गाड्या दाखल झाल्या असून नवीन व जुन्या कांद्याची आवक मोठया प्रमाणात होत आहे. त्यामध्ये कांद्याला उठाव कमी असल्याने बाजारभाव उतरले आहेत. कांद्याचा दर्जा ही घसरला असून पाल्याचा कांदा अधिक येत आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. मागील आठवड्यात प्रतिकिलो १०रु ते १४ रुपयांनी उपलब्ध असलेला कांदा आता ५-१० रुपयांनी विक्री होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- नवी मुंबई : नेरूळ येथून ५० हजार रुपयांची गावठी दारू जप्त

एपीएमसी बाजारात डिसेंबरनंतर नवीन कांद्याची अधिक आवक होत असते. मात्र याचवेळी बाजारात साठवणुकीचा कांदा देखील विक्रीसाठी बाहेर काढला जातो. सध्या बाजारात शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला जुना कांदा देखील बाजारात दाखल होत आहे. दोन्ही कांद्याची आवक वाढली आहे. कांद्याची पुणे, नाशिक मधून आवक सुरू असून एपीएमसी बाजारात नित्याची १०० हुन अधिक गाड्यांची आवक असते. परंतु सोमवारी बाजारात कांद्याच्या १५० गाड्या दाखल झाल्या आहेत. मोठया प्रमाणात कांदा दाखल होत असून यामध्ये साठवणुकीचा पाल्याचा कांदा अधिक निघत आहे, त्यामुळे भाव गडगडले आहेत. सातत्याने दरात घरसण होत असल्याने शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत. सध्या घाऊक बाजारात कांद्याच्या दर्जेनुसार हलक्या प्रतीचा कांदा १ ते २ रुपये तर उच्चतम प्रतीचा कांदा ५ ते १० रुपयांनी उपलब्ध आहे.

हेही वाचा- नवी मुंबईत भव्य हिंदू जन आक्रोश मोर्चा; लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधात कायदा करण्याची मागणी

बटाटा ही गडगडला

मुंबई कृषी उत्पन्न बाजारात कांद्यापेक्षाही बटाटा वरचढ ठरत होता. तीन आठवड्यांपूर्वी एपीएमसी बाजारात बटाटा प्रत्येक किलो २० ते २५ रुपयांनी विक्री होत होता. परंतु कांद्याप्रमाणेच बटाट्याच्या दरातही सातत्याने घसरण होत आहे . मागील आठवड्यात बटाटा प्रति किलो १२ ते १४ रुपये दराने उपलब्ध होता, सोमवारी बाजारात बटाट्याच्याही ८० गाड्या दाखल झाल्या आहेत . बाजारात बटाट्याचीही मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने दर गडगडले आहेत . घाऊक बाजारात बटाटा आता प्रतिकिलो ५ ते १० रुपयांनी विक्री होत आहे.