एपीएमसी बाजारात गेल्या काही महिन्यांपासून कांद्याने उच्चांक गाठला होता. परंतु आता कांद्याचे दर आवाक्यात येत असून मागील महिन्याभरापासून कांद्याच्या दरात घसरण होत आहे. घाऊक बाजारात प्रतिकिलो कांदा १५-१८ रुपयांवर उपलब्ध असलेला कांदा आता ८ ते १२ रुपयांवर तर सर्वाधिक मोठ्या साईचा गोला कांदा २०-२२रुपयांवरून १५-१६ रुपयांवर उपलब्ध आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- नवी मुंबई: जागतिक दिव्यांग दिनी दिव्यांगत्व आणि स्वच्छतेविषयी वॉकेथॉनव्दारे जनजागृती

एपीएमसी बाजारात पावसाने महाराष्ट्र नवीन कांद्याच्या उत्पादनावर परिणाम झाला होता. त्यामुळे नवीन कांद्याचे हंगाम लांबले होते. तसेच जुने साठवणुकीचे कांदे पावसाने भिजल्याने खराब होत होते. त्यामुळे यादरम्यान सर्वात उच्चतम प्रतिचा कांदा भाव खात होता. परंतु मागील एक महिन्यापासून सर्वच एपीएमसी बाजारात कांद्याच्या दरात घसरण होत आहे . बाजारात आज शनिवारी १२० गाड्या आवक झाली आहे. बाजारात कमी प्रमाणात ग्राहक खरेदीला येत असल्याने बाजारात गाड्या शिल्लक राहत आहेत. त्यामुळे आवक जास्त असून मागणी कमी होत असल्याने दर घसरले आहेत, अशी माहिती घाऊक व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिली आहे.

हेही वाचा- एपीएमसी सभापतीसाठी रस्सीखेच सुरू; शिंदे गटाचे प्रभु पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता

किरकोळ बाजारात मात्र लुटच !

गेल्या महिन्याभरापासून एपीएमसी बाजारात कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. एकीकडे कांद्याचे दर कमी होत असले तरी किरकोळ बाजारात मात्र ग्राहकांची आर्थिक लूट सुरूच आहे. गेल्या आठवड्यापासून एपीएमसी बाजार समितीत कांदा १५ ते १८ रुपयांवर होता, आज तो ८ ते १२ रुपये आहे . तरीदेखील किरकोळ बाजारात मात्र प्रतिकिलो कांदा ३० ते ३५ रुपये दराने विकला जात आहे. घाऊक बाजारात कांद्याचे दर उतरले असले तरी किरकोळ बाजारात मात्र कांदा चढ्या दराने विक्री होत आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Onion prices fall in apmc market navi mumbai dpj