,वाशीच्या बाजारात कांद्याची जादा आवक होत असून त्याप्रमाणात मालाला उठाव नसल्याने बाजारभाव उतरले आहेत. प्रतिकिलो ८-११ रुपयांवर विकला जाणारा कांदा ६ ते ९ रुपयांवर आलेला आहे. एपीएमसी बाजारात डिसेंबर जानेवारीत नवीन कांद्याची अधिक आवक होत असते. यावेळी दर कमी होण्यास सुरुवात होते. आता बाजारात जुना साठवनुकीचा कांदा दाखल होत आहे.
बाजारात कांद्याची पुणे, नाशिक ,नगर मधून आवक सुरू असून शुक्रवारी तब्बल १००गाड्या दाखल झाल्या आहेत. सर्वच बाजार समितीत कांद्याचे दर घसरले असून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ही पुरवठाच्या तुलनेत मागणी कमी असल्याने दरात घसरण पहावयास मिळत आहे. गुरुवारी बाजारात सर्वात आकाराने मोठा कांदा प्रतिकिलो ११ रुपयांनी उपलब्ध होता परंतु बाजारात शुक्रवारी दरात आणखीन घसरण झाली असून ९ रुपयांनी विक्री झाला तर त्याच्या खालील दर्जाचा कांदा ६ ते ७रुपयांनी विक्री होत आहे.