नवी मुंबई शहरात दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने सर्वांची तारांबळ उडाली होती. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बटाटा बाजारात अचानक धोधो पावसामुळे कांदे भिजले आहेत. शहरात दुपारी एक वाजेपर्यंत कडक उन्ह होते. परंतु दुपारी नंतर अचानक ढगाळ वातावरण त्यात सुसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती.
हेही वाचा >>> नवी मुंबई : अग्निशमन विभागामार्फत नागरिकांना आपत्ती सुरक्षिततेचे धडे
बाजार आवारात गाळ्यांबाहेर पाणी साचले होते. त्यामुळे गाळ्या बाहेर विक्रीसाठी ठेवलेले कांदे भिजले. ऐनवेळी पावसाने धुमाकूळ घातल्याने भिजलेले कांदे उचलण्यासाठी व्यापाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. आधीच बाजारात मोठया प्रमाणावर खराब कांदे दाखल होत असून त्यात पावसाने भिजल्याने कांद्याचे नुकसान झाले आहे.