कामोठे वसाहतीमधील ७० वर्षीय जेष्ठ नागरिकाला अ़ॉनलाईन व्यवहारात भामट्यांनी २७ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकऱणी कामोठे पोलीस ठाण्यात अनोळखी चोरट्यांविरोधात रितसर तक्रार दिली असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. अजय उमापद मित्रा असे या सेवानिवृत्त जेष्ठ नागरिकाचे नाव आहे. मित्रा हे कामोठे येथील सेक्टर २० मधील पार्थ एन्हेन्यू या सोसायटीत राहतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ‘विजय’ आणि ‘विराट’ एपीएमसीमध्ये दाखल, पार पडला लाँचिंग सोहळा

मित्रा यांनी सोफा व बेड विक्रीसाठी एका नामांकित कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्यावर भामटयांनी मित्रा यांना संपर्क साधला. सहा भामट्यांनी मित्रा यांना वेळोवेळी व्यवहार पुर्ण होणार असल्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून २७ लाख ७७ हजार २३५ रुपये अॉनलाईन पद्धतीने फसवणूक करुन लंपास केले. अखेर मित्रा यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Online fraud of twenty seven lakh rupees to senior citizens amy