नवी मुंबई – नवी मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात यावर्षी जून महिना कोरडा गेला तर जुलै महिन्यात दमदार पाऊस पडला त्यामुळे मोरबे धरण भरण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे पालिकेने मोरबे धरण काही दिवसांतच भरेल यासाठी धरणाचे वक्राकार दरवाजे उघडण्याची चाचपणी घेतली होती. परंतु ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली असून मोरबे धरणात आतापर्यंत एकूण २८३८ मिमी. पावसाची नोंद झाली असताना ऑगस्ट महिन्याच्या मागील १५ दिवसांत फक्त १४२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे मोरबे धरण यंदा तरी भरणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण एकीकडे पाऊस थांबला असताना दररोज शहराला पाणीपुरवठ्यासाठी ४६० दशलक्षलीटर पाणी उपसा केले जात आहे.

यंदा जून महिन्यात पावसाने हात आखडता घेतला होता. परंतु जुलै महिन्यातील दमदार पावसामुळे धरणात चांगला जलसाठा उपलब्ध झाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात २३ जूनपर्यंत फक्त ३३ दिवस पाणीपुरवठा करता येईल एवढाच पाणीसाठा शिल्लक होता. परंतु जुलैच्या महिनाभरात मोरबे धरणाच्या व माथेरानच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणाचा पाणीसाठा झपाट्याने वाढला. मोरबे धरणातून पुढील वर्षी ८ जुलै २०२४ पर्यंत नवी मुंबईकरांना सुरळीत पाणीपुरवठा करता येईल एवढा जलसाठा धरणात झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात माथेरानच्या डोंगररांगामध्ये काही दिवसांतच ४००० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. तर मोरबे धरण क्षेत्रात आतापर्यंत २८५४ मिमी. पाऊस पडला आहे.

Maharashtra rain updates
Maharashtra Rain News: दक्षिण महाराष्ट्राला बिगर मोसमी पावसाचा फटका, आणखी दोन दिवस पावसाचा जोर
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
India Meteorological Department has warned a rain alert for 15 districts of Maharashtra state
‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !
Cloudy over South Madhya Maharashtra and South Konkan Mumbai print news
राज्यात गुरुवारपासून हलक्या सरी; जाणून घ्या, दिल्लीत दाट धुके का पडले
The Meteorological Department has given the forecast of rain in the state of Maharashtra
थंडी सुरू झाली नाही की आता पाऊस येऊन धडकणार…राज्यातील या भागात…
Air quality deteriorated in Colaba Deonar Kandivali Mumbai news
कुलाबा, देवनार, कांदिवलीमधील हवा ‘वाईट’
mumbai weather updates city records moderate air quality
मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच

हेही वाचा – मला मुख्यमंत्री बनवायला निघाले की फटाके बांधायला? आमदार वडेट्टीवार व धानोरकर यांच्या भर सभेत एकमेकांना कोपरखळ्या

नवी मुंबई मोरबे धरण परिसरात जुलै महिन्यात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. मोरबे धरण हे ८८ मीटरला १०० टक्के भरते. धरणात गेल्यावर्षीच्या तुलनेत अधिक जलसाठा झाला आहे. परंतु मागील १५ दिवसांपासून पावसाच्या विश्रांतीमुळे धरण भरणार का याबाबत शंका निर्माण झाली आहे.

मोरबे धरणात चांगला पाणीसाठा झाला असला तरी पावसाने मात्र चांगलीच उघडीप घेतली आहे. धरणात चांगला पाणीसाठा उपलब्ध असला तरी वर्षभराच्या पाणीपुरवठ्याबाबत पालिका नियोजनबद्ध व योग्य ती खबरदारी घेत आहे. पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. धरण १०० टक्के भरावे अशी अपेक्षा आहे. – संजय देसाई, शहर अभियंता

हेही वाचा – गडचिरोली : वनहक्क जमीन घोटाळ्याप्रकरणी भूमाफिया आणि अधिकाऱ्यांना अभय, लहान कर्मचाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड?

मागील काही दिवसांत मोरबेत झालेला पाऊस

१८ ऑगस्ट- १५.४ मिमी.
१७ ऑगस्ट- १.४ मिमी.
१६ ऑगस्ट- ०० मिमी
१५ ऑगस्ट- ३.८ मिमी.
१४ ऑगस्ट- २.२मिमी.
१३ ऑगस्ट- १९.४ मिमी.
१२ ऑगस्ट- ६.८ मिमी.
११ ऑगस्ट- २५.६ मिमी.
१० ऑगस्ट- ५.८ मिमी.
९ऑगस्ट- १०.२ मिमी.
८ ऑगस्ट- ३.२ मिमी.

मोरबे धरणातील पाणीसाठ्याची सद्यस्थिती

  • आतापर्यंत पडलेला एकूण पाऊस – २८५४. ८० मिमी.
  • धरणातील पाणीसाठा- ९१.७३ टक्के
  • कधीपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा करता येणार – ८ जुलै २०२४