उरण : ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व असलेल्या उरणच्या द्रोणागिरी डोंगराच्या बेकायदा उत्खननाला चाप लावण्यासाठी महसूल विभागाने कर्मचाऱ्यांचा चोवीस तास जागता पहारा ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. द्रोणागिरीच्या उत्खननामुळे उरणमधील पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. तो थांबविण्यासाठी आणि डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या एक हजार वस्तीवर मृत्यूच्या दरडीचे सावट आल्यानंतर तब्बल १५ वर्षांनंतर महसूल विभागाला जाग आली आहे. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी द्रोणागिरी डोंगर वाचवण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांचा अहोरात्र जागता पहारा सुरू करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा… उरण : चाणजेमधील जलजीवनचे अपूर्ण ‘मिशन’, दोन वर्षे मुदतीचे काम वर्षभरापासून रखडले

हेही वाचा… वाशीत कापडी पिशव्या देणारे यंत्र कार्यान्वित

उरण तालुक्यातील चाणजे महसुली हद्दीत ऐतिहासिक द्रोणागिरी डोंगर उभा आहे. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरच असलेल्या या द्रोणागिरी डोंगरामुळे समुद्राची धूप थांबविण्यासाठी आणि उंच डोंगरामुळे पावसाचे ढग अडकून परिसरात पाऊस पडण्यास मोठी मदत मिळते. संरक्षणाचीही जबाबदारी सांभाळणाऱ्या, ऐतिहासिक महत्त्व असलेल्या द्रोणागिरी डोंगराच्या माथ्यावर ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ला आहे. तर पायथ्याशी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील ओएनजीसी प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे संरक्षण करण्यासाठीही डोंगर उपयुक्त ठरत आहे. उत्खनन थांबविण्यात शासकीय यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली होती. उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मागील १५ वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्ष आणि पाठपुराव्यानंतर महसूल खात्याला जाग आली आहे. महसूल विभागाने ऐतिहासिक द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याशी उत्खननाला चाप बसवण्यासाठी अहोरात्र जागता पहारा सुरू केला आहे. रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी उरण तहसीलदारांना कडक सूचनाही दिल्या आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Onwards revenue employees will keep twenty four hours vigilance in dronagiri illegal excavation asj