काँक्रीटीकरणासाठी खारफुटीची अडचण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सीवूड्स सेक्टर २५ आणि २७ या दोन सेक्टरमधून जाणाऱ्या नाल्यामधील दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत पालिकेकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. मात्र, खारफुटीमुळे काँक्रीटीकरणापूर्वी वनविभागाची परवानगी लागणार असल्याने काम रखडले आहे.

सीवूड्स २५ आणि २७ या दोन्ही सेक्टरच्या मधून हा नाला वाहतो. पुढे हा नाला वंडर्स पार्कजवळ असलेल्या नेरुळ सेक्टर १९ आणि १९अ मध्ये येतो. त्यामुळे नेरुळकरांनाही नाल्याच्या दरुगधीचा त्रास होतो.

महापालिकेने या नाल्याच्या काँक्रीटीकरणासाठी कोटय़वधी रुपये खर्च केले. मात्र ते वंडर्स पार्कपर्यंतच करण्यात आले. पुढे हा नाला नैसर्गिक पद्धतीनेच वाहत आहे. त्यामुळे पुढे पाणी साठून परिसरात दुर्गंधी पसरते. तसेच या नाल्याजवळून जाताना नागरिकांना आणि जवळच असलेल्या तिलक आणि प्रेझेंटेशन शाळेमधील विद्यार्थ्यांनाही नाक मुठीत घेऊन शाळेत जावे लागते. त्यामुळे या नाल्याच्या काँक्रीटीकरणाची मागणी स्थानिक नगरसेविका सलुजा सुतार यांनीही पालिकेकडे केली. मात्र या नाल्याजवळ खारफुटी असल्याने याबाबतची पाहणी पालिका आणि वनविभागाकडे पाठवण्यात आली असल्याने या नाल्याचे काम वनविभागाच्या परवानगीत अडकले आहे.

त्यामुळे रहिवाशांना या दुर्गंधीचा त्रास आणखी किती दिवस सहन करावा लागणार, असा प्रश्न माजी नगरसेवक संदीप सुतार यांनी उपस्थित केला आहे.

महापालिकेने आवश्यक ठिकाणी काम करण्याची आवश्यकता आहे. सीवूड्स सेक्टर २५ आणि २७ मधून झालेल्या नाल्याचे काँक्रीटीकरण न झाल्याने खराब, घाण काळे पाणी येथून वाहते. त्यामुळे दुर्गंधी पसरते.

– सुभाष सावंत, नागरिक

काँक्रीटीकरण करण्यात आलेले नाही, कारण या नाल्यात खारफुटी असल्याने याबाबत वनविभागाची परवानगी आवश्यक आहे. त्यासाठी हा प्रस्ताव वनविभागाकडे पाठवण्यात आला आहे.

– पंढरीनाथ चवडे, अभियंता, नवी मुंबई महापालिका.