सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांनी १ जून ते ३० जून २०१६ या कालावधीत सन २०१० ते ३१ मे २०१६ पर्यंत हरविलेल्या बलकांचा शोध घेण्याकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ऑपरेशन मुस्कान महाराष्ट्र – २ शोध मोहीम घेण्याचे आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात १ जून ते ३० जून या कालावधीत ऑपरेशन मुस्कान महाराष्ट्र २ ही शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. ऑपरेशन मुस्कान महाराष्ट्र २ या शोधमोहीम कालावधीत सन २०१० ते ३१ मे २०१६ पर्यंतच्या कालावधीत हरविलेल्या व पळविलेल्या पंरतु मिळून न आलेल्या मुलांची माहिती नव्याने अद्ययावत संकलित करण्यात येणार आहे. नवी मुंबई आयुक्तालयातील मुलांचे आश्रयगृह, अशाकीय संस्था, रेल्वे स्थानके, बस स्थानके, रस्त्यावर किंवा सिग्नलवर भीक मागणारी अथवा वस्तू विकणारी मुले, कचरा गोळा करणारी मुले तसेच धार्मिक स्थळे, रुग्णालये आदी ठिकाणी कामे करणारी मुले अशा मुलांना हरविलेली मुले समजून फोटो घेऊन अशा मुलांची माहिती http://www.trackthemisssingchild.com <http://www.trackthemisssingchild.com/> या संकेतस्थळावर भरण्यात येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा