पनवेल : सिडको महामंडळाने राजकीय शक्तींना हाताशी धरुन नवी मुंबई विमानतळ अधिसूचित प्रभाव क्षेत्रात (नैना) पायाभूत सुविधा पुरवू पाहत असल्याने अगोदर नैनाबाधितांचे प्रश्न सोडवा, त्यानंतर विकासकामे करा अशी भूमिका महाविकास आघाडीतील घटकपक्षांच्या नेत्यांनी घेतल्यामुळे पुन्हा एकदा सिडकोचे ठेकेदार व महाविकास आघाडीतील नेते यांच्यात संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

विशेष म्हणजे शेकापक्षाच्या नेत्यांपैकी जे. एम. म्हात्रे यांनासुद्धा नैनाचे ५२३ कोटी रुपयांचे काम मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महाविकास आघाडीचे नेते काही दिवसांत नैना प्रकल्पाचा ठेका मिळालेल्या ठेकेदारांची भेट घेऊन त्यांना हे काम सुरू करू नये अशी विनंती करणार असल्याची माहिती माजी आ. बाळाराम पाटील यांनी दिली.

Accused of robbery gold bank arrested goods worth seven and a half lakhs seized
सोन्याची पेढी लुटणाऱ्या आरोपींना अटक, साडेसात लाखांचा मुद्देमाल हस्तगत
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Shilpa Shetty Post on Ladki Bahin Yojana
Shilpa Shetty : लाडकी बहीण योजनेवर शिल्पा शेट्टीची पोस्ट, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी..”
msrdc to change in alignment of shaktipeeth expressway
शक्तिपीठ महामार्गाच्या संरेखनात बदल; एमएसआरडीसीकडून पर्यावरण परवानगीचा प्रस्ताव मागे
School Male Cleaner Abuse Girls in Badlapur
Badlapur School Case : “दादाने माझे कपडे काढले”, बदलापूर अत्याचार प्रकरणातील घाबरलेल्या मुलीने पालकांना दिली होती माहिती; FIR मध्येही नोंद!
Female Doctor Suicide
Doctor Suicide : “डिअर अहो, बाय! मी मेल्यावर…” सात पानी पत्र लिहून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पतीच्या छळाला कंटाळून उचललं पाऊल
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”

आणखी वाचा-उरण : मासळीचा नवा हंगाम, मात्र मच्छीमारांना अनेक समस्या

सिडको संचालक महामडंळाची ऑगस्ट महिन्यात झालेल्या बैठकीत नैना नगर परियोजना क्रमांक २ ते ७ यामध्ये रस्ते व इतर पायाभूत सुविधांची विकासकामे एल. अॅण्ड टी. कंपनी, टीआयपीएल,  जे. एम. म्हात्रे इंफ्रा, अजवानी कंपनी, पी. पी. खारपाटील, पी. डी. इन्फ्रा या ठेकेदार कंपन्यांना वाटप केली. महिना अखेरपर्यंत या ठेकेदारांना या कामाचे कार्यादेश दिले जातील. मात्र प्रत्यक्षात ही कामे सूरु होतील का याविषयी साशंकता निर्माण केली जात आहे.

महाविकास आघाडीने आठ दिवसात दोन वेगवेगळ्या बैठका पनवेलमध्ये घेऊन नैना क्षेत्रातील विकासाला विरोध दर्शविला आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनी शेकापचे जे. एम. म्हात्रे यांच्या कंपनीला नैना प्रकल्पाचे काम मिळाले असल्यास त्यांच्याही कंपनीला विरोध करण्याची भूमिका घेतल्याची माहिती  शेकापचे माजी आ. बाळाराम पाटील यांनी दिली. जे. एम. म्हात्रे इंफ्रा या कंपनीला नैनातील ५२३ कोटी ५० लाख रुपयांची विकासकामांचा ठेका मिळाला आहे. मूळ दरापेक्षा म्हात्रे यांच्या कंपनीला अनुक्रमे ३७ टक्यांनी वाढीव दर देवून ही कामे त्यांच्या कंपनीला दिली आहेत. 

आणखी वाचा-शेतकऱ्यांच्या वाढीव मोबदल्याची कोट्यवधींची थकबाकी, शासनाचे वाटपाचे आश्वासन कागदावरच

पनवेल भाजपचे आ. प्रशांत ठाकूर आणि अपक्ष आ. महेश बालदी यांनी नैना प्रकल्पाच्या समर्थनार्थ शेतकरी व नैना अधिकारी यांच्यात संवाद मेळावा घेतला. आ. ठाकूर यांच्या कुटूंबियांची भागीदारी असलेल्या टीआयपीएल कंपनीला सुद्धा सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत नैना क्षेत्रातील पायाभूत विकासातील ५२५ कोटी रुपयांची कंत्राटे देण्यात आली आहेत. हा ठेका सुद्धा मूळ किमतीपेक्षा ३८ टक्के वाढीव दराने देण्यात आला. उर्वरीत कामे अजवानी कंपनी, पी. पी. खारपाटील, पी. डी. इन्फ्रा या कंपन्यांना वाटप झाली आहेत. याबाबत सिडको मंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल यांची प्रतिक्रीया जाणून घेण्यासाठी संपर्क साधला मात्र संपर्क होऊ शकला नाही. 

नैना प्रकल्पाविषयी महाविकास आघाडीतील सर्वच राजकीय पक्षांची भूमिका अगदी स्पष्ट आहे. कोणीही शेतक-यांमध्ये संभ्रम निर्माण करु नये. ज्या ठेकेदारांना सिडकोने नैना क्षेत्रात कामे कऱण्यासाठी नेमले. त्या सर्वच ठेकेदार कंपनीला महाविकास आघाडीच्यावतीने आमचे शिष्ट मंडळ भेटून नैना विरोधातील आंदोलनाचे आमचे मुद्दे पटवून देऊन, येथील शेतक-यांचे होणारे नूकसान ध्यानात आणून देऊन जोपर्यंत शेतक-यांचे प्रश्न सुटत नाही. तोपर्यंत काम न करण्यासाठी विनंती प्रथम करु. लेखी निवेदनसुद्धा ठेकेदारांना महाविकास आघाडीची समिती देणार आहे. त्यानंतरही कामे करण्यासाठी ठेकेदार कंपन्यांनी तयारी दर्शविल्यास त्या ठेकेदारांविरोधात उभे राहू. मग ते ठेकेदार आमच्या पक्षाचे असोत कींवा नसोत सर्वच ठेकेदारांविरोधात शेतकरी भूमिका घेतील. – बाळाराम पाटील, माजी आमदार, शेकाप