लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उरण: येथील महानिर्मितीच्या वायू विद्युत केंद्रात शनिवारी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीआयटीयू) या केंद्रीय कामगार संघटनेची स्थापना करण्यात आली. यावेळी विद्युत केंद्रातील कंत्राटी कामगारांना त्यांचे न्याय हक्क देण्याचा निर्धार करण्यात आला. सीटूचे रायगड जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड मधुसुदन म्हात्रे यांच्या हस्ते युनियनच्या नाम फलकाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी जेएनपीटीचे माजी कामगार विश्वस्त कॉम्रेड भूषण पाटील, जनवादी महिला नेत्या हेमलता पाटील, सिटूचे संतोष ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते पद्माकर पाटील, पराग ठाकूर आदीजण उपस्थित होते.

उरणच्या वायू विद्युत केंद्रात ३० वर्षाहून अधिक वर्षे स्थानिक कामगार काम करीत आहेत. मात्र या कामगारांना जीवन जगण्यासाठी आवश्यक किमान वेतन, बोनस, जीवन विमा, वैद्यकीय सुविधा, सुरक्षा उपकरणे, त्याचप्रमाणे इतर सुविधा उपलब्ध करण्याची मागणी करण्यात येणार आहे. केंद्रात झालेल्या स्फोटात मृत्यू पावलेल्या कंत्राटी कामगारांला न्याय मिळवून देण्यासाठी लढा द्यावा लागला. त्याला यश आले आहे. मात्र कामगारांना योग्य न्याय देण्यासाठी सीटू लढणार असल्याचे सांगून, याकरीता वायू विद्युत केंद्राच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाणार असल्याची माहीती भूषण पाटील यांनी दिली.

आणखी वाचा- नवी मुंबई : महापालिकेच्या ३ सार्वजनिक रुग्णांलयात ६० वर्षांवरील नागरिकांसाठी कोविड प्रिकॉशन डोस उपलब्ध

तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणात बदल करण्यासाठी एकजूट व संघर्ष या सीटूच्या घोषणेनुसार एक होण्याचे आवाहन करण्यात आले. वायू केंद्रात संतोष पाटील(अध्यक्ष) योगेश पाटील(उपाध्यक्ष) गिरीश पाटील(सचिव) अमित पाटील, विनोद पाटील, स्वप्नील घरत, मंगेश पाटील, आयेश ठाकूर, मनोज पाटील, दीपेश पाटील, राम रसाळ, अंजली म्हात्रे, प्रीती घाणेकर, विशाल पाटील, राकेश पाटील यांची कमिटी जाहीर करण्यात आली आहे.