करोनाच्या दीर्घ त्रासदीयुक्त कालावधीनंतर आलेला दिवाळी सण प्रत्येक नागरिकाने उत्साहात साजरा केलेला असताना ज्येष्ठ नागरिक भवन, सीवूड्स, सेक्टर ४८, नवी मुंबई येथील सभागृहात ‘संगीत वर्षा’ संगीत विद्यालयातर्फे ‘दिवाळी संगीत संध्या’ हा सुमधूर गायनाचा बहारदार कार्यक्रम खास ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे विभागातील ज्येष्ठांना संगीत विरंगुळ्याचा आनंद मिळाला.
हेही वाचा >>>उरण-पनवेल मार्गावरील साकव दुरुस्तीची प्रतिक्षा; सिडको आणि पीडब्लूडीच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे हाल
अभंग, भक्तिगीते, भावगीते, कोळी गीते, चित्रपट गीते, स्फुर्तीगीते अशा विविधांगाने नटलेल्या संगीतमय संध्याकाळचा आस्वाद घेत, आनंदयात्रींनी या संधीचा आनंद लुटला. संगीतप्रेमी श्रोत्यांच्या सक्रिय उपस्थितीने बहार आणली. या प्रसंगी घनश्याम परकाळे यांनी निवेदनाची जबाबदारी सांभाळली. गायक चमुमध्ये वर्षा जाधव, उज्वला शिवरकर, संतोष साखरे, संतोष थळे, प्रविण पाटील, विशाल राजगुरू, श्रीराम कुळकर्णी, बाल गायक मास्टर अर्जुन यांनी गायलेली सदाबहार मराठी हिंदी गाण्यांच्या आनंद ज्येष्ठांनी घेतला. ज्येष्ठांनीही संगीताच्या तालावर नृत्य करत आनंद लुटला .ज्येष्ठ नागरिक संस्थेचे शांताराम रोकडे, लोलेकर, कुंडे यांच मोलाचं सहकार्य लाभले. शांताराम रोकडे यांनी संगीत वर्षा गायन वृंदाचा यथोचित सन्मान करत संगीत आनंदवनभवनाचे आभार मानले.