लहान वयापासूनच स्वच्छतेचे संस्कार मुलांच्या उमलत्या मनावर रुजविण्यासाठी शालेय पातळीवर विध उपक्रम राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांमार्फत त्यांच्या पालकांपर्यंत कचरा वर्गीकरण आणि स्वच्छतेचे महत्व पोहचावे व दररोज नियमित वर्गीकरण कऱण्याविषयी पाल्यांमार्फत त्यांना सांगितले जावे यादृष्टीने या उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. नवी मुंबईत अशाच प्रकारचा शालेय स्तरावरील ‘ड्राय वेस्ट बँक’ नावाच्या उपक्रमाचे आयोजन कऱण्यात आले होते. या उपक्रमात शाळेतील ५७ विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.

हेही वाचा- नवी मुंबई : वाशी मनपा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; तीन वर्षांनी सात जणांवर गुन्हा दाखल 

Sustainability Crusader Award Announced to Alok Kale Founder and Managing Director of Magnus Ventures Pune news
औद्योगिक कचऱ्यातून नवव्यवसायाची निर्मिती! पुण्यातील तरुण उद्योजकाचा प्रवास
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
leakage from main water pipeline schedule for water supply disrupts in bandra
मुख्य जलवाहिनीतून गळती; वांद्रे परिसरातील पाणीपुरवठ्यासाठी विशेष वेळापत्रक
clean up marshal action against those responsible for littering
क्लीन अप मार्शलकडून अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; पालिकेच्या तिजोरीत आठ महिन्यांत ३ कोटी दंड जमा
Shortage of public toilets in Pune city
वानवा.. स्वच्छतागृहांची
kdmc steps to cut off water connection and electricity supply to 58 illegal buildings in dombivli
डोंबिवलीतील ५८ बेकायदा इमारतींमधील पाणी, वीजपुरवठा खंडित करण्याच्या हालचाली, उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कारवाईचे नियोजन
kala lake, Kalyan, Indurani Jakhad, contractor Notice,
कल्याण : काळा तलाव साफसफाईत दिरंगाई करणाऱ्या ठेकेदाराला नोटीस, आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची कारवाई

या उपक्रमाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील सुका कचरा वेगळा ठेवण्याची सवय लागावी. तसेच कचरा वर्गीकरणाचे महत्व स्वकृतीतून पटावे यादृष्टीने त्यांनी प्लास्टिक बॉटल, चीप्स अथवा चॉकलेटचे कव्हर, टेट्रापॅक अथवा टिन, काचेच्या बाटल्या, घरगुती प्लास्टिक आठवड्यातून एक दिवस शाळेत जमा करण्यात येणार आहेत.

या उपक्रमांतर्गत त्यांनी जितक्या प्रमाणात या वस्तू जमा केल्या त्या प्रमाणात त्यांना पॉईंट्स देण्यात येत असून ते पॉईंट्स नोंदविण्यासाठी विद्यार्थ्यांना ‘ड्राय वेस्ट पासबुक’ देण्यात आलेले आहे. या पासबुकमध्ये वर्गशिक्षकांमार्फत त्यांनी जमा केलेल्या सुक्या कचऱ्याच्या प्रमाणात देण्यात येणारे पॉईंट्स नोंदवून ठेवण्यात येत आहेत. प्रत्येक १००, २००, ५०० पॉईंट्स जमा झाल्यावर विद्यार्थ्यांना प्रोत्साहनात्मक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. अशा प्रकारे जास्तीत जास्त पॉईंट्स मिळविणाऱ्या महापालिका शाळा क्र. ३ आग्रोळी येथील ३४ विद्यार्थ्यांना त्यांनी मिळविलेल्या पॉईंट्सच्या प्रमाणात वही, पेन, कंपासपेटी, अशा प्रकारच्या शालोपयोगी वस्तू देण्यात आलेल्या आहेत.

हेही वाचा- नवी मुंबई: हिवाळी अधिवेशनानंतरच एपीएमसी संचालक सुनावणी, संचालकांना दिलासा

नुकत्याच सुरु झालेल्या या अभिनव उपक्रमांतर्गत ३ वेळा सुका कचरा जमा करण्यात आला असून साधारणत: ३२७ किलो सुका कचरा जमा करण्यात आला आहे. जमा झालेले प्लास्टिक घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत स्वतंत्रपणे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी नेला जाऊन तेथील ड्राय वेस्ट कलेक्शन पॉई्ट्स येथे जमा केला जाणार आहे. त्याचप्रमाणे २हजार पॉईंट्स प्राप्त करणाऱ्या उत्कृष्ट विद्यार्थ्यास ‘वेस्ट वॉरियर’ प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे.

Story img Loader