अंबरनाथमधील आनंदनगर औद्योगिक वसाहतीमधील गोळीबार प्रकरणी खांदेश्वर पोलीसांनी रविवारी रात्री पंढरी फडकेला अटक करुन शिवाजीनगर पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले. बैलगाडा शर्यतीवरुन दोन गटातील वादावर तोडगा काढण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, या बैठकीदरम्यानच वाद सुरु झाल्यानंतर पंढरीशेठ फडके गटाने कल्याणच्या राहुल पाटील गटावर गोळीबार केल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीच्या वादातून अंदाधुंद गोळीबार; समेट घडवण्याच्या वेळीच वाद उफाळला

बैलगाडा शर्यतीच्या वादातून राहुल पाटील आणि पंढरी फडके यांच्यात अनेक महिन्यापासून समाजमाध्यमांमध्ये वाद सूरु आहेत. हे वाद मिटविण्यासाठी एक बैठक अंबरनाथमध्ये होणार होती. मात्र त्यापैकीच हा गोळीबार झाला. या गोळीबारात कोणीही जखमी झाले नसले तरी रस्त्यावर सामान्य प्रवाशांची येजा सूरु असताना हा गोळीबार झाल्याने सामान्यांना त्यांचा जिव मुठीत घेऊन पळापळ करावी लागली. याबाबत पंढरी फडके व त्याच्या साथीदारांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून रविवारी रात्री उशिरा नवी मुंबईतील खांदेश्वर पोलीस स्टेशनमध्ये पंढरी फडके याला अटक करून शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

हेही वाचा- जितेंद्र आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल! ठाणे शहरात ठिकठिकाणी जाळपोळ; पाहा धक्कादायक Video

न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने बैलगाडा शर्यतीला परवानगीला दिली असली तरी हीच बैलगाडा शर्यत सध्या सामान्य नागरिकांच्या जिवावर बेतणारी ठरत आहे. यापूर्वीही फडके याला क्रिकेट सामन्यात शस्त्राचे प्रदर्शन केल्यामुळे पोलिसांनी कारवाई केली होती. मात्र, त्यावेळी त्याने सिनेमात वापरणारे पिस्तुल असल्याचे सांगितल्याने पोलीसांना कारवाई न करताच सोडून द्यावे लागले. यावेळीही फडके गटाकडून बनावट पिस्तुल असल्याची सबब देण्यात येईल, अशी चर्चा पनवेलमध्ये सूरु आहे. राहुल पाटील याचाही बैलगाडा आहे आणि फडके याचा बैलगाडा आहे. शर्यतीमध्ये माझाच बैल श्रेष्ठ यावरुन हा वाद सूरु आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pandhari phadke arrested in ambernath firing case due to dominance of bullock cart race navi mumbai dpj