Raigad Khalapur Irshalgad Irshalwadi Landslide : खालापूर तालुक्यातील दुर्घटना कळल्यानंतर तात़डीने मध्यरात्रीच मदतकार्याला सूरुवात झाली. नवीमुंबई , पनवेल आणि परिसरातील सर्वच पालिकेच्या आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज होऊन चौकफाट्याकडे निघाल्या. पनवेल आणि नवी मुंबई महापालिकांची आपत्ती व्यवस्थापनाची पथक मदतीसाठी सरसावल्या होत्या. पालिका प्रशासनासोबत पनवेल आणि नवी मुंबई परिसरात काम कऱणारे मोठे ठेकेदार तसेच सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मदतीसाठी येथे आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पनवेल पालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनूसार १०० सफाई कामगार, ११० ब्लॅकेंट, पाण्याच्या बाटल्या, बॅटरी व इतर साहीत्यासोबत मृतदेह ठेवण्यासाठीच्या पिशव्या, दोन जेसीबी, पनवेल पालिकेचे आरोग्य विभाग यांच्यासोबत पालिकेचे उपायुक्त सचिन पवार आणि सहाय्यक आयुक्त वैभव विधाते यांचे पथक कार्यरत होते. मदतकार्याला सूरुवात करण्यासाठी पथकाला नैसर्गिक अडचणींचा सामना करावा लागला.

हेही वाचा >>>उरण : पूर ओसरल्यावर आता चिरनेरमध्ये सापांचा धोका , नागरीकांमध्ये भितीचे वातावरण

इर्शाळवाडीत वाहन थेट जाण्यासाठी वाट नसल्याने पायी चालण्याशिवाय मदतकार्यासाठी आलेल्या पथकाला पर्याय नव्हता. एनडीआरएफचे जवानांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली. मात्र त्यांनाही वाडीवर चालत जावे लागले. त्यादरम्यान पाऊस कमी होत नसल्याने मदतकार्यासाठी आणलेले जेसीबी, पोकलेन यांसारखे साहीत्य चौकफाट्यावर उभे करुनच हातामध्ये फावडा, कुदळ व इतर साहीत्य घेऊन मजूर आणि एनडीआरफच्या जवानांनी मदतीला सूरुवात केली.

हेही वाचा >>>उरण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत ८०५ कुटुंब बाधित

मदतकार्यासाठी आलेल्या पथकाला चालत चार ते पाच किलोमीटर चालून गेल्यावर जखमींपर्यंत पोहचता आले. तोपर्यंत जखमींना उपचारासाठी पनवेल व नवी मुंबई येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. डॉक्टरांचे विशेष पथकासह आरोग्यसेवकांचे पथक येथे तैनात करण्यात आले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panvel and navi mumbai municipal corporation have mobilized for raigad irshalgad landslide disaster relief amy