Taloja flyover : तळोजा औद्योगिक वसाहतीमधून मुंब्रा पनवेल महामार्गाला जोडणाऱ्या नावडेफाटा येथील उड्डाणपुलावर मोठे भगदाड पडल्याने अपघातास आमंत्रण असे चित्र पुलावर आहे. वाहतूक पोलिसांनी बुधवारी या भगदाडात कोणतेही वाहन अडकू नये यासाठी भगदाडापासूनच्या परिसराला बॅरीगेट्स लावून परिसर सुरक्षित केला. मात्र पुलावर पडलेल्या आरपार भगदाडामुळे पुलाच्या बांधकामाबाबत उद्योजकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 

हेही वाचा – मोरबे धरण ९३ टक्के भरले

Pune Municipal Corporation cleanliness drive on pedestrian bridges Pune news
अडलेले ‘पाऊल’ पडले पुढे! पादचारी पूल आवश्यक ठिकाणीच; असलेल्या पुलांवर महापालिकेची स्वच्छता मोहीम
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Mumbai Nashik Highway Accident Latest Updates in Marathi
Mumbai Nashik Highway Accident : मुंबई नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा भीषण अपघात, तीन जण जागीच ठार
वाढवण-इगतपुरी द्रुतगती महामार्गाचे संरेखन निश्चित
Butibori bridge case, Butibori bridge case,
नागपूर : बुटीबोरी पूलप्रकरणी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह, साडेतीन वर्षांत पुलास तडे
khopte bridge loksatta latest news
उरण : खोपटे पुल दुरुस्तीसाठी पाच कोटींचा निधी मंजूर, आधुनिक पद्धतीने पुलाचे मजबूतीकरण
Vashi toll plaza toll exemption traffic congestion mumbai entryways
टोलमुक्तीनंतरही कोंडी कायम, वाशी टोलनाक्यावर दोन्ही प्रवेशमार्गांवर वाहतुकीचा ताण
ST bus brakes fail at Anaskura Ghat Drivers saves 50 passengers lives
अणस्कुरा घाटात एसटी बसचे ब्रेक निकामी; चालकाच्या प्रसंगावधाने वाचले ५० प्रवाशांचे प्राण

हेही वाचा – ऐरोलीतील मोक्याची जागा बड्या उद्याोगपतीला? टाऊनशिप उभारणीच्या नावाखाली ‘सिडको’चे अजब धोरण

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) २००४ साली संबंधित उड्डाणपूल लाखो रुपये खर्च करुन बांधला होता. बीयुबी कंपनीने हा उड्डाणपूल बांधला होता. सुरुवातीचे पाच वर्षे बीयुबी कंपनीकडे या पुलाची डागडुजी करण्याची अट होती. परंतु, २० वर्षांनी पुन्हा एकदा या पुलाच्या कामाविषयी साशंकता निर्माण केली जात आहे. या उड्डाणपुलामुळे तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये येजा करणाऱ्या वाहनचालकांची दिवा पनवेल रेल्वे मार्गावरील फाटकात तासंतास प्रतिक्षा करण्याची समस्या संपली होती. सतत या पुलावर होणारी अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे या पुलावर खड्डे पडले आहेत. हा पूल बांधल्यापासून या पुलावर सतत पडणाऱ्या खड्ड्यांमुळे हा पूल नेहमी चर्चेत राहिला आहे. याबाबत एमआयडीसीचे उपअभियंता दीपक बोबडे पाटील यांनी तातडीने उड्डाणपुलावरील दुरुस्तीचे काम हाती घेत असल्याची माहिती दिली. उड्डाणपुलावर भगदाडाची दुरुस्ती करण्यासाठी कमी वर्दळीवेळी रात्रीचे काम करण्यासाठी एमआयडीसी प्रशासन पूर्वतयारी करत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Story img Loader