पनवेल : मागील पाच दिवसांपासून गावठाण विस्तार योजना राबविण्यासाठी आणि मुंबई उर्जा प्रकल्पातील वीज वाहिनीची दिशा गुरे चरण्याच्या जमीनीतून बदलावी या मागण्यांसाठी चिंध्रण ग्रामस्थ उपोषणाला बसले होते. शुक्रवारी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून भारतीय जनता पक्षाचे आ. प्रशांत ठाकूर आणि प्रशासन प्रतिनिधी म्हणून पनवेलचे प्रांताधिकारी, तहसिलदार, वरिष्ठ पोलीस निरिक्षक हे उपोषणकर्त्यांसह गावकऱ्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. सकाळी साडेदहा वाजता ग्रामस्थांसोबत लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकाऱ्यांचा संवाद सूरु झाला. मात्र तीन तासांच्या चर्चेनंतरही ग्रामस्थांच्या मागण्यांवर कोणतेही ठोस पर्याय न निघाल्याने ग्रामस्थांनी आंदोलन सूरुच ठेवण्याची भूमिका मांडली.

अखेर आ. ठाकूर यांनी या संवाद बैठकीतून निघण्याचा मार्ग पत्करला. आ. ठाकूर व प्रांताधिकारी बैठकीच्या मंडपातून बाहेर पडताना चिंध्रण ग्रामस्थांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. चिंध्रण ग्रामस्थांनी गावठाण विस्तार योजना राबविण्याची मुख्य मागणीसाठी आंदोलन केले होते. आ. ठाकूर यांनी त्यांच्या ग्रामस्थांसमोरील निवेदनात सध्या या मागणीसाठी ग्रामस्थांनी शासनाला प्रस्ताव देणे गरजेचा असतो. नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचीत क्षेत्र (नैना) प्रकल्पात ग्रामस्थ त्यांच्या स्वतःच्या जागेत घरे बांधू शकतात, असे मत मांडले. तसेच गावठाण विस्तार योजनेसाठी उपोषणासारखे टोकाचे पाऊल आजच ग्रामस्थांनी उचलू नये, असे आ. ठाकूर म्हणाले.

Demand money from company owner in name of MLA Pune news
आमदाराच्या नावाने कंपनी मालकाकडे पैशांची मागणी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nitin Gadkari Kothrud , Chandrakant Patil,
विकासासाठी महायुतीची गरज, नितीन गडकरी यांचे आवाहन
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
vip political leaders checking during the election campaign
बॅग तपासणीवरून नवे वादंग; नाहक त्रास देण्याचा प्रयत्न, महाविकास आघाडीचा आरोप, विरोधकांकडून केवळ राजकारण : महायुतीचे प्रत्युत्तर
former ministers who rebel and won
अनेक माजी मंत्री, आमदारांचा बंडखोरी करून विजयाचा इतिहास, देशमुख, केदार, बंग, जयस्वाल आदींचा समावेश
Hadapsar, NCP, Hadapsar latest news,
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई

हेही वाचा : सोनाराच्या दुकानातून बुरखा घालून चोरी; ऐवज तपासणीत चोरी उघड

पळस्पे ग्रामस्थांनी उपोषण केल्यावर त्यांना सिडको मंडळाने गावठाण विस्तार योजनेबाहेरील घरांचे सर्वेक्षण तीन महिन्यात करुन संबंधित मालमत्ताधारकांना मालमत्तापत्र देऊ, असे लेखी आश्वासन दिले होते. शुक्रवारी आ. ठाकूर यांच्यासह प्रांताधिकारी राहुल मुंडके, तहसिलदार विजय पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल पाटील हे ग्रामस्थांची भेट घेण्यासाठी आल्यावर आंदोलनकर्त्यांना आज निर्णय होईल, अशी अपेक्षा होती. मात्र दोन्ही मागण्यांपैकी एका मागणीबाबत लेखी आश्वासन न मिळाल्याने आंदोलक आक्रमक झाले. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी समीर पारधी या 21 वर्षीय उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली होती.