पनवेल : कळंबोली येथील मुंबई महानगर प्रदेश लोखंड पोलाद बाजार समितीच्या मुदतठेवी बँकेत ठेवण्याच्या बहाण्याने भामटा व त्याच्या साथीदारांनी ५४ कोटी रुपयांचा अपहार केला होता. नवी मुंबई गुन्हे अन्वेषण युनीट दोनच्या पोलीस पथकाने या गंभीर प्रकरणात चौकडीला अटक केल्यानंतर त्यांच्याकडून चार आलिशान मोटारी जप्त केल्या आहेत. तसेच मोटारींसह एक गाळा, सदनिका आणि काही बँक खाती गोठवून काही मालमत्तेवर सह निबधंक विभागाकडून बोजा चढविला आहे. या अपहारातील मुख्य आरोपीने राज्यातील लोखंड बाजार समितीच्या अपहारातील रकमेची उधळण तेलंगणा येथे केल्याचे उजेडात येत आहे. सध्या ही चौकडी न्यायालयीन कोठडीत आहे.
दीड महिन्यापूर्वी कळंबोली पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला होता. मुंबई महानगर प्रदेश लोखंड पोलाद बाजार समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी निकम यांच्या तक्रारीनंतर नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी या गंभीर गुन्ह्याचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग युनीट २ कडे सोपविला होता. पोलीस निरिक्षक उमेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाची सखोल तपास सूरु आहे. पोलीसांनी अजूनही या प्रकरणात अटक करणे शिल्लक असल्याने अटकेत असलेल्या आरोपींची माहिती पोलीसांनी देण्यास नकार दिला.
राज्यातील लोखंड बाजार समितीच्या ५४ कोटींच्या अपहारातील रक्कम भामट्याने तेलंगणात उधळली
कळंबोली येथील मुंबई महानगर प्रदेश लोखंड पोलाद बाजार समितीच्या मुदतठेवी बँकेत ठेवण्याच्या बहाण्याने भामटा व त्याच्या साथीदारांनी ५४ कोटी रुपयांचा अपहार केला होता.
Written by संतोष सावंत
नवी मुंबई
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 30-07-2024 at 18:56 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panvel embezzlement of rs 54 crore by fake bank manager and accomplices exposed luxury cars seized assets frozen psg