लक्ष्मीपूजनाच्या रात्री पैशांचा पाऊस पाडतो, असा दावा करून चौघांची हत्या करून आणि त्या चौघांजवळील लाखो रुपये लुटणारा संशयित आरोपी चंद्रकांत देहू वाघमारे याचा अखेर क्षयरोगाच्या आजाराने अंत झाला. २०१२ सालच्या दिवाळीत पनवेलमधील फार्महाऊसवरील चौघांच्या हत्याकांडाने राज्यातील सर्वाचे लक्ष्य वेधले होते. घटनेनंतर ७२ तासांमध्ये वाघमारेला रसायनी येथील आदिवासीपाडय़ातून पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर तो तळोजा मध्यवर्ती कारागृहात बंदी होता, काही महिन्यांपूर्वी त्याला क्षयरोगाने ग्रासल्याने त्याच्यावर मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी रात्री पावणे नऊ वाजता वाघमारे याचा मृत्यू झाला.
२०१२ची दिवाळी ऑक्टोबर महिन्यात होती, दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या रात्री पनवेल तालुक्यातील हाजीमलंग गडाच्या पायथ्याशी शिरवली गावातील डॉ. दत्तात्रय पाटील यांच्या फार्महाऊसवर चौघांची हत्या झाल्याची घटना घडली होती. मृतातील तिघांना पिस्तुलातून गोळ्या घालून मारले, तर एकाच्या डोक्यात दगड ठेचून ठार केले होते. नवीन पनवेल पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेवरील मृतदेहांसोबत असलेल्या दारूच्या बाटल्यांमुळे हा आपसातील व्यवहारामुळे झालेला वाद असल्याचा अंदाज होता. परंतु घटनास्थळावरील अबीर, गुलाल व इतर वैदिक विधीच्या साहित्यामुळे हा अघोरी प्रकार असल्याचा संशय पोलिसांना आला होता. घटनास्थळावरून १२ लाख ७२ हजार रुपये चोरीस गेल्याचे मृतांच्या नातेवाईकांनी पोलिसांत नोंदविले होते. नवीन पनवेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे हे या प्रकरणाचा तपास करीत होते. पोलिसांनी ७२ तासांमध्ये या प्रकरणाचा मुख्य व एकमेव सूत्रधार चंद्रकांत वाघमारे याला अटक केली. चंद्रकांतने पैशांचा पाऊस पाडतो म्हणून अमावस्येच्या रात्री या चौघांना रोख रकमा घेऊन येथे बोलावले होते. मृत व्यक्तींनी आपण कोठे जातोय, याची माहिती कोणालाही देऊ नये अशीही अट वाघमारेने या सर्वाना घातली होती. नवीन पनवेल येथील ज्योतिषी नितीन जोशी, पेणधर गावातील रामदास पाटील, शिवकर गावातील बाळाराम टोपले आणि आसूडगाव येथील प्रीतम म्हात्रे अशी या मृतांची नावे आहेत. चंद्रकांत याला पोलिसांनी पकडण्यासाठी प्रीतम म्हात्रे यांच्या मोबाइल फोनमधील दोन फोन क्रमांकांमुळे या गुन्ह्य़ाला वाचा फुटली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खून झालेल्या रात्री तिघांना दारू पाजून त्यांना फार्महाऊसवरील वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन गोळ्या घालून त्यांचे खून केले, तर हे तीन खून रामदास पाटील यांनी करून त्यांनी स्वत:हून आत्महत्या केल्याचे भासविण्यासाठी चंद्रकांतने पाटील यांच्या हातात पिस्तूल देऊन त्यांचे डोके दगडाने ठेचले होते. शिरवली गावातील ग्रामस्थांना गोळीबाराचा आवाज येऊ नये म्हणून चंद्रकांतने त्याच दरम्यान फार्महाऊसमध्ये फटाके फोडले होते. मात्र मोबाइल फोनमुळे आणि घटनेच्या पहाटे मुंबई पुणे दिशेकडे जाणाऱ्या महामार्गावरील टोलनाक्यावरील सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासल्यानंतर त्यांना पल्सर दुचाकीवरून जाणारा चंद्रकांत दिसला. पोलिसांनी चंद्रकांतकडून १२ लाख ६४ हजार रुपये जप्त केले होते.