पनवेल : पनवेल तालुक्यामध्ये मागील २४ तासांमध्ये ११० मीलीमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. संततधारेमुळे काही ठिकाणी वगळता सखल भागात पाणी साचण्याच्या घटना गुरुवारी दुपारपर्यंत घडल्या नाहीत. गाढी नदीतील पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा चार मीटरने कमी होती. परंतू पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने नांदगाव पुलाखाली एक मोटार अडकल्याची घटना घडली. मुसळधारांमुळे आणि दुपारी समुद्राच्या मोठ्या भरतीमुळे महापालिकेने गुरुवारी शाळांना सकाळी सुट्टी जाहीर केली. सरकारी प्रशासनाचे लक्ष समुद्राच्या भरती आणि पडणाऱ्या पावसाकडे लागले आहे.

गाढी नदीतील नांदगाव पुलाखाली दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरु असते. परंतू नदीकाठी आज पाणी पातळीत वाढ झाल्याने मोटार या पाण्यात अडकली. मोटारीत बसलेल्या वाहनचालकावर बाका प्रसंग ओढावला. मात्र वाहनचालक सुखरूप मोटारीतून बाहेर पडला. मोटार पाण्यातून बाहेर काढण्यासाठी टोईंग व्हॅनची मदती घ्यावी लागली.

हेही वाचा…हेटवणे धरणाचे ६ दरवाजे उघडले आता तरी पाणी कपात रद्द करा – रहिवाशांची मागणी

Assembly Election 2024 Extra Rounds of Best Bus on Polling Day Low floor deck buses will run for disabled elderly voters
मतदानाच्या दिवशी बेस्ट बसच्या जादा फेऱ्या; दिव्यांग, वृद्ध मतदारांसाठी ‘लो फ्लोअर डेक’ बस धावणार
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
shiv sena shinde group claim 73 thousand duplicate voters in navi mumbai
गावाकडच्या दुबार मतदारांमुळे नवी मुंबईत खळबळ
local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
uran karanja road potholes
उरण-करंजा मार्गाची दुरवस्था कायम
Follow up of demands to candidates through manifesto from Rickshaw Panchayat before elections
रिक्षाचालकांच्या मागण्या ऐरणीवर! निवडणुकीच्या तोंडावर रिक्षा पंचायतीकडून जाहीरनाम्याद्वारे उमेदवारांकडे पाठपुरावा
Ignorance of Municipal Corporation and Traffic Police Department towards not working traffic signal
नागपूर : बंद वाहतूक सिग्नल; वाहनचालकांना मन:स्ताप, महापालिका-वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

निम्मी मोटार नदीपात्रात अडकली होती. गुरुवारी पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आपत्ती टाळण्यासाठी पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी सरकारी शाळा, खासगी व्यवस्थापनाच्या शाळा, महाविद्यालय, आश्रमशाळा, प्रशिक्षण केंद्रांना सुट्टी देण्याविषयीचे परिपत्रक जाहीर केले होते. गुरुवारी सकाळपासून पनवेलमधील नद्या दुथडी भरुन वाहत होत्या. खाडी क्षेत्रातही पाणी पातळी वाढलेलीच होती.