पनवेल : पनवेल तालुक्यामध्ये मागील २४ तासांमध्ये ११० मीलीमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. संततधारेमुळे काही ठिकाणी वगळता सखल भागात पाणी साचण्याच्या घटना गुरुवारी दुपारपर्यंत घडल्या नाहीत. गाढी नदीतील पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा चार मीटरने कमी होती. परंतू पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने नांदगाव पुलाखाली एक मोटार अडकल्याची घटना घडली. मुसळधारांमुळे आणि दुपारी समुद्राच्या मोठ्या भरतीमुळे महापालिकेने गुरुवारी शाळांना सकाळी सुट्टी जाहीर केली. सरकारी प्रशासनाचे लक्ष समुद्राच्या भरती आणि पडणाऱ्या पावसाकडे लागले आहे.
गाढी नदीतील नांदगाव पुलाखाली दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरु असते. परंतू नदीकाठी आज पाणी पातळीत वाढ झाल्याने मोटार या पाण्यात अडकली. मोटारीत बसलेल्या वाहनचालकावर बाका प्रसंग ओढावला. मात्र वाहनचालक सुखरूप मोटारीतून बाहेर पडला. मोटार पाण्यातून बाहेर काढण्यासाठी टोईंग व्हॅनची मदती घ्यावी लागली.
पनवेलच्या गाढी नदीपात्रात मोटार अडकली
गाढी नदीतील नांदगाव पुलाखाली दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरु असते. परंतू नदीकाठी आज पाणी पातळीत वाढ झाल्याने मोटार या पाण्यात अडकली.
Written by लोकसत्ता टीम
पनवेल
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-07-2024 at 14:55 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panvel heavy rain causes traffic disruptions school holiday declared amid high water levels car got stuck in the gadhi river bed psg