पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये तळोजा वसाहतीमध्ये दोन ठिकाणी, कोयनावेळे आणि घोट या चार ठिकाणी नवीन स्मशानभूमीचे बांधकाम पालिका प्रशासन करणार आहे. यासाठी पालिका १०.६८ लाख रुपये खर्च करणार आहे. नुकतीच याबाबतची निविदा जाहीर करण्यात आली.

तळोजा वसाहतीमध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मातील नागरिकांसाठी स्मशानभूमीसाठी विविध राजकीय पक्षांना जनआंदोलने उभारावी लागली. पालिका प्रशासनाने सिडको मंडळाकडून संबंधित भूखंडाचे हस्तांतरण झाल्यानंतर हे भूखंड ताब्यात घेऊन त्यावर विकासकामांची सुरुवात केली आहे. तळोजा फेज एक येथील सेक्टर १५ येथील भूखंड क्रमांक १० वरील १४९९.५३ चौरस मीटर क्षेत्र, तळोजा फेज २ मध्ये ५७८ चौरस मीटरचा भूखंड, कोयनावेळे येथील १२६१ चौरस मीटरचा भूखंड आणि घोट येथील ५७६.५३ चौरस मीटर भूखंडावर पालिका स्मशानभूमीसाठी बांधकाम करणार आहे. पालिकेच्या बांधकाम विभागाने यासाठी १० कोटी ६८ लाख १६ हजार रुपयांची निविदा जाहीर केली आहे.

हेही वाचा…‘हिरकणी’ रुग्णालयाचा आराखडा अंतिम टप्यात, पनवेल महापालिकेचे दोन एकर जागेवर आठ मजली रुग्णालय

सर्व प्रभागांमध्ये स्मशानभूमी असावी असे नियोजन पनवेल महापालिका आय़ुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. स्मशानभूमीसाठी कोयनावेळे, घोट आणि तळोजा वसाहतीमध्ये दोन ठिकाणी आरक्षित भूखंडाचे हस्तांतरण प्रक्रिया सिडको मंडळाकडून पार पडल्याने महापालिका आयुक्तांनी निर्देशित केल्याने संबंधित विकासकामे निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर केली जाणार आहेत. संजय कटेकर, शहर अभियंता, पनवेल महापालिका

Story img Loader