रविवारी खारघरच्या सर्व रहिवाशी आणि व्यापा-यांनी मद्यविक्रीविरुद्द मोहीम हाती घेत वसाहत एक दिवस बंद ठेवली होती. नागरीकांनी रस्त्यावर उतरत निदर्शने आणि घोषणाबाजी केली होती. या सर्व घडामोडीला २४ तास उलटत नाही तोच

यांनी सर्वसाधारण बैठकीत रहिवाशांच्या मागणीचा विचार करत मोठा निर्णय घेतला आहे. यापूढे राज्य उत्पादन शुल्क विभागाने पनवेल पालिकेच्या स्थापनेनंतर किंवा नव्याने पूर्वीच्या खारघर ग्रामपंचायत हद्दीत मद्यविक्रीसाठी बार व रेस्टॉरंटला न देण्याचा ठराव पालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत घेण्यात आला आहे.

Thane Municipal Corporation bans POP Ganesh idols in Thane
ठाण्यात पीओपी गणेश मुर्तींना बंदी, ठाणे महापालिकेचा निर्णय
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
citizens affected by garbage fires in kolhapur
कोल्हापुरात कचरा आगीने त्रस्त नागरिकांकडून संताप; प्रशासक धारेवर, पालकमंत्र्यांचीही भेट
Ghodbunder water shortage in old Thane
घोडबंदरपाठोपाठ जुन्या ठाण्यातही पाणी टंचाई; पाणी समस्या सोडवाच पण, तोपर्यंत टँकरने मोफत पाणी द्या, बैठकीत मागणी
Pune Traffic Congestion, Amitesh Kumar,
पुणे : कोंडी फोडण्यासाठी आयुक्त रस्त्यावर, अतिक्रमणांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’चे आदेश
Commissioner orders surgical strike on encroachments to break traffic jam
कोंडी फोडण्यासाठी आयुक्त रस्त्यावर, अतिक्रमणांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’चे आदेश
corruption, ST , Nana Patole,
जनतेला लुटण्यापेक्षा एसटी महामंडळातील भ्रष्टाचार थांबवा – नाना पटोले
Motor Accident Claims Tribunal , vacancies ,
मोटार अपघात दावा न्यायाधिकरणातील रिक्त पदे कधी भरणार ? उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा

हेही वाचा- नवी मुंबई: कोपरखैरणे रेल्वे स्थानकाबाहेर रस्त्यांच्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

रायगड जिल्ह्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने ५ सप्टेंबर रोजी खारघरमधील सेक्टर १० येथील निरसूख पॅलेस या बारला मद्यविक्रीचा परवाना दिला होता. यामुळे खारघरमध्ये रहिवाशी रस्त्यावर उतरले होते. निरसूख पॅलेस या बारला दिलेला मद्यविक्रीचा परवाना रद्द करा, अशी मुख्य मागणी नागरिकांची होती.

पनवेल पालिकेची स्थापना १ ऑक्टोबर २०१६ ला झाली. पालिकेच्या स्थापनेपूर्वी खारघर वसाहत हा खारघर ग्रामपंचायतीचा भाग होता. पनवेल पालिकेच्या स्थापनेपूर्वी खारघर ग्रामपंचायत हद्दीत दारुबंदीचा ठराव सर्वानुमते ग्रामस्थांनी घेतला होता. तो दारुबंदीचा ठराव अद्याप पालिकेने बदललेला नाही, असे आयुक्त गणेश देशमुख यांनी सर्वसाधारण बैठकीत स्पष्ट करत ग्रामपंचायतीच्या तरतूदी संक्रमन अवस्थेत सर्व निर्णय जशास तसे लागू राहत असल्याचे स्पष्ट केले. याचसोबत ग्रामपंचायतीने घेतलेले लोकोपयोगी निर्णय पालिकेच्या स्थापनेमुळे ते रद्द होत नाहीत. उलट ते निर्णय कायम राहतात असेही ठरावाला मान्यता देताना आयुक्तांनी म्हटले. त्यामुळे यापूढे राज्य उत्पादन शुल्क विभागाने पनवेल पालिकेच्या स्थापनेनंतर किंवा नव्याने पूर्वीच्या खारघर ग्रामपंचायत हद्दीत मद्यविक्रीसाठी बार व रेस्ट्रोरेन्टला परवानगी देऊ नये, हा ठराव पालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत घेण्यात आला. या ठरावाची प्रत संबंधित विभागांना पाठविणार असल्याचेही पालिका आयुक्त देशमुख यांनी स्पष्ट केले. सध्या पालिकेवर प्रशासकाची सत्ता आहे.

हेही वाचा- नवी मुंबई: हॉटेलमध्ये घुसून सिनेस्टाईल मारामारी; दोघांना पोलिसांकडून अटक

खारघर वसाहतीच्या दोन्ही चतु:सीमेपर्यंत आयुक्त देशमुख यांनी घेतलेला खारघर दारुबंदीचा ठराव प्रभावशाली ठरणारा आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने पनवेल पालिकेची कोणतीही परवानगी न घेता निरसूख बारला परवानगी दिली होती. त्यामुळे आयुक्त देशमुख यांनी सोमवारी घेतलेल्या ठरावानंतर निरसूख बारचा परवाना रद्द करण्याची वेळ येईल असेही चित्र आहे. परंतू त्याचसोबत पालिकेच्या स्थापनेपूर्वी अजीत पॅलेस व रॉयल ट्युलिप या हॉेटेलमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या मद्यविक्रीच्या परवान्याबाबत काय निर्णय घेणार याकडे खारघरवासियांचे लक्ष लागले आहे. विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन खारघरमध्ये आंदोलन उभारले होते.

या भागात असणार दारुबंदी

आज झालेल्या ठरावानुसार महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती ‘अ’ मधील पुर्वाश्रमीचे खारघर ग्रामपंचायत क्षेत्रसिमीत खारघर ग्रामपंचायत पुर्व बाजू-खारघर से.१७ संपूर्ण, से.१६ पूर्व बाजू (खाडी लगत), सायन पनवेल हायवेवरील पूल, ओमकार एम्पायर इमारत से.१०, मानसरोवर रेल्वे ब्रिज, तळोजा खाडी ते पनवेल महानगरपालिका हद्दीपर्यंत, खारघर ग्रामपंचायत पश्चिम बाजू – पनवेल महानगरपालिका खारघर गावाची पश्चिम दिशेकडील महसुल हद्द, खारघर टेकडी, खारघर हिल, फणसवाडी, खारघर व्ह्युव पॉईंट, चाफेवाडी, खारघर ग्रामपंचायत उत्तर बाजू- चाफेवाडी गाव, खारघर टेकडी ते खारघर व्ह्युव पॉईंट, गोल्फ कोर्स रोडने सी.जे.एम.शाळा सिअमय इमारत ते ग्राम विकास भवन, खारघर से.०६, भुखंड क्र.८,१३,१४ से. २१, भुखंड क्र.८५ से.२१, निलमकुंज भुखंड क्र.१५१ (प्रस्तावित महापौर बंगला), खारघर से. २०, , प्लॉट नं.८० ते प्लॉट नं. ८५,७७,७७ए,५७,५६,५२, ५१, भुखंड क्र.८६ ते ९५ से.१९, भुखंड क्र. ११ब, ११अ, भुखंड क्र. २३४ ते २४३, खारघर ग्रामपंचायत दक्षिण बाजू- मानसरोवर, खारघर रेल्वे ब्रिज, तळोजा खाडीने पनवेल महानगरपालिका हद्दीपर्यंत खारघर गावाची दक्षिणेकडील महसुल हद्द या चतु:सिमा दर्शविण्यात आलेल्या आहेत. या क्षेत्रासाठी सर्व प्रकारच्या किरकोळ व घाऊक मद्यविक्री व साठा करण्यास परवानगी असणार नाही.

Story img Loader