मोकळ्या जागांवर झोपडय़ांचे अतिक्रमण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
खांदेश्वर येथील मोडकळीस आलेल्या वसाहती हा प्रभाग १५ मधील सर्वात मोठा प्रश्न आहे. सिडकोने या समस्येकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे महापालिकेने तरी ही समस्या सोडवावी, अशी येथील रहिवाशांची अपेक्षा आहे.
खांदेश्वर वसाहतीची निर्मिती कळंबोली वसाहतीच्या सोबतच सिडको प्रशासनाने केली. येथील ‘ए’ टाइप वसाहत सिडकोनेच उभारली. या वसाहतीच्या सोडतीमध्ये लाभार्थी ठरल्याने मुंबईतील असंख्य नागरिकांचे स्वत:च्या घरांचे स्वप्न याच प्रभागात प्रत्यक्षात उतरले. मध्यम उत्पन्न गटातील हे लाभार्थी खांदेश्वर वसाहतीच्या पायाभरणीपासून येथे राहत असले तरी त्यांच्या मागे लागलेली घरघर २० वर्षांनंतरही कायम आहे. सिडकोने बांधलेल्या या वसाहती आता मोडकळीस आल्या आहेत. त्यांचे रूपांतर सोसायटीत झाल्याशिवाय हा प्रश्न सुटणे अशक्य आहे. सिडकोचे या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. पनवेल महापालिका प्रशासनाने या पुनर्बाधणीला लवकरात लवकरच हिरवा कंदील दाखवावा, अशी येथील रहिवाशांची अपेक्षा आहे. याच वसाहतींमधील मोकळ्या जागेत झोपडय़ा बांधून राहणाऱ्यांची संख्या काही स्वघोषित पुढाऱ्यांनी वाढविल्यामुळे प्रश्न अधिकच जटिल झाला आहे.
या प्रभागात मध्यवर्गीय, शहरी मतदारांची संख्या मोठी आहे. त्यांना वसाहतीपासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या खांदेश्वर रेल्वेस्थानकातून रोज ये-जा करावी लागते. त्यांच्यासाठी बससेवा आहे, मात्र ती लोकलच्या वेळेनुसार असावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. महापालिकेने खांदेश्वर वसाहतीमधील सेक्टर २, ७ व ११ येथून दर १० मिनिटांनी सुटणारी व रेल्वे स्थानकापर्यंत जाणारी मिनीबस सेवा सुरू करावी, अशी येथील महिला प्रवाशांची मागणी आहे. सध्याची एनएमएटीची बस खांदेश्वर स्थानकापासून लांब थांबते. त्याच्या अलीकडे तीन आसनी रिक्षांचा थांबा आहे. त्यामुळे प्रवाशांना पायपीट करावी लागते. हे टाळण्यासाठी तीन आसनी रिक्षाथांब्याजवळच बसथांबा असावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
ए टाइप या वसाहतीमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होतो, अशी येथील रहिवाशांची तक्रार आहे. सिडको प्रशासनाकडे वारंवार दाद मागूनही हा प्रश्न सुटलेला नाही, त्यामुळे महापालिका प्रशासनाने पाणी मुबलक द्यावे अशी महिलांची अपेक्षा आहे. ५० हजार लोकवस्ती असलेल्या या प्रभागात सार्वजनिक शौचालयांचा अभाव आहे. राजकीय पक्षांच्या काही नेत्यांनी स्वच्छतागृहांची जागा बळकावत तिथे पक्षांची कार्यालये थाटली आहेत. काही ठिकाणी मंदिरे बांधून अतिक्रमण केले आहे. याच वसाहतीमध्ये खांदेश्वर व नवीन पनवेल या दोन्ही वसाहतींमधील दुवा असणारा सेक्टर ९ येथील उड्डाणपूल आहे. या उड्डाणपुलाच्या खाली वाहने पार्क करण्यास मनाईचा आदेश झळकावला असतानाही तेथे नागरिक वाहने उभी करतात. सिडको प्रशासनाने इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देताना पुरेसे पार्किंग क्षेत्र असल्याची खातरजमा करून न घेतल्यामुळे नागरिकांना वाहने रस्त्यांवर उभी करावे लागतात. त्यामुळे या परिसरात वाहनचोरी मोठय़ा प्रमाणावर होते.
खांदेश्वर वसाहतीमधील नागरिकांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे. पोलीस चौकीच्या जागेवर चार वर्षांपूर्वी आघाडी सरकारच्या काळात येथे तात्पुरते पोलीस ठाणे सुरू करण्यात आले. त्यानंतर पोलिसांना पोलीस ठाणे स्वतंत्र बांधण्यासाठी सिडकोने जागा देऊ केली. मात्र जागेच्या तांत्रिक वादामुळे चौकीच्या जागेत अतिक्रमण करून पोलीस ठाणे सुरू करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. येथील पदपथांचा ताबा फेरीवाले व टपरीचालकांनी घेतल्यामुळे रस्त्यातून चालावे लागते. याचाच फायदा चोरटय़ांनी घेतल्यामुळे या परिसरात मंगळसूत्र चोरीचे प्रमाण मोठे आहे. महापालिकेने मैदानाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी होत आहे.
फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायम
तीन वर्षांपूर्वी खांदेश्वर पोलीस ठाण्यात घुसून नासधूस करण्यात आली होती. वारकरी मंडळींचा सप्ताह पोलिसांनी बंद केल्यामुळे हा वाद झाला. त्यानंतर संतप्त जमावाने पोलीस ठाण्यात पोलिसांना मारहाण केली. फेरीवाल्यांकडून हप्ते घेणाऱ्यांना शिक्षा दिली अशा संदेश त्या वेळी पसरवण्यात आला होता. त्यानंतर मात्र फेरीवाल्यांना हप्तेखोरीचा त्रास झाला नाही. फेरीवाल्यांचा प्रश्न खांदेश्वरमध्ये मोठा आहे. परंतु यापूर्वी पनवेल नगरपरिषद व सिडकोने काही फेरीवाल्यांना फेरीवाला क्षेत्रात जागा देऊन त्यांचे पुनर्वसन केले आहे. त्यामध्ये राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हात धुवून घेतले, अनेक वर्षांनंतर फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे.
प्रभागाची ओळख –
खांदेश्वर वसाहतीमधील निम्मा भाग या प्रभागात येतो. संपूर्ण शहरी नागरीवस्ती असलेला हा प्रभाग आहे. खांदेश्वर वसाहतीमधील शीव पनवेल महामार्गालगतच्या नेत्रज्योत रुग्णालयपासून या प्रभागाची सुरुवात होते. सेक्टर १, २, ७, ८, ९, ११ हा परिसरा याच प्रभागामध्ये आहे.