पहाटेपासून सुरू होणारा प्रचाराचा धुमाकूळ रात्री तरी वेळेत थांबेल, याची दक्षता निवडणूक आयोगाने घेतली आहे. निवडणूक आयोगाची गाडी रोज रात्री प्रत्येक प्रचार कार्यालयासमोर जाऊन १० वाजले आता कार्यालय बंद करा, अशी आठवण उमेदवार आणि कार्यकर्त्यांना करून देत आहे.

Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
Pune city needs better mental health facilities pune
लोकजागर: शून्य शहर!
Chandrashekhar Bawankule gave hints about confusion over allocation of guardian ministers will end in two days
पालकमंत्री वाटपाचा घोळ दोन दिवसात संपणार, बावनकुळेंचे संकेत
Natasha Poonawalla and Adar Poonawalla
Adar Poonawalla: “माझी पत्नी रविवारी मला…”, अदर पूनावाला यांचाही उपरोधिक टोला; म्हणाले, “आठवड्याला ९० तास काम…”
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ, “सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही संध्याकाळी…”
Image Of Harsh Goenka.
L&T Chairman : “रविवारचे नाव ‘Sun-Duty’ करा”, रविवारीही काम करण्याचा सल्ला देणाऱ्या एल अँड टी च्या अध्यक्षांना अब्जाधीशाचा टोला

पनवेल महापालिकेवर आपलाच झेंडा फडकावा, यासाठी सर्वच राजकीय पक्ष रात्रीचा दिवस करून कामाला लागले आहेत. निवडणूक म्हणजे कमाईचा काळ, हे लक्षात घेऊन पडेल ते काम करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. कामाच्या स्वरूपानुसार रोज ३०० ते ५०० रुपयांची कमाई करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. रोज संध्याकाळी हातात रोख रक्कम पडत आहे. प्रचार कार्यालयात आल्यानंतर संबंधित कार्यकर्त्यांला न मागता चहा, कॉफी,थंडगार पाणी मिळत आहे. उमेदवाराचे परिचय पत्र हाती घेऊन, आपल्या राजकीय पक्षाचा शेला गळ्यात घालून कार्यकर्ते घरोघरी प्रचारासाठी जात आहेत.

अकरा वाजता प्रचार फेरी. पुन्हा कार्यालयात आल्यावर कोकम सरबत, शीतपेये आणि लिंबू सरबत दिले जाते. शाकाहारी व मासांहारी जेवणाची सोय असते. सायंकाळी साडेपाच वाजता प्रचाराला पुन्हा सुरु वात होते. हाती टॅब घेतलेली आणि गळ्यात शेले घातलेली हायटेक फौज घेऊन उमेदवार पुन्हा घरोघरी जातात. लहान मुले दिसल्यास त्यांच्याशी खेळताना आणि ज्येष्ठ नागरिक दिसल्यास त्यांचा आशीर्वाद घेताना छायाचित्रे टिपण्याची संधी साधली जाते.

खाण्याची चंगळ

निवडणुकीमुळे कार्यकर्त्यांची खाण्याची चंगळ झाली आहे. सायंकाळी चार तास प्रचारात सहभागी झाल्यास ५०० रुपये व बिर्याणीचे पाकीट दिले जाते. मात्र सोमवार, मंगळवार, गुरुवार व शनिवारी शाकाहारी तर बुधवार, शुक्रवार, रविवारी मांसाहारी बिर्याणी मिळते.

एलईडीचा प्रचार जोशात

वाहनावर एलईडी स्क्रीन लावून त्यावर प्रचाराची चित्रफीत दाखवण्याचा ट्रेंड वाढला आहे. यात आपले कार्य, आपला पक्ष, त्याची धोरणे आणि पक्षाचे नेते कसे थोर आहेत, हे दाखवण्याची संधी साधली जात आहे. या चित्रफिती चौकाचौकांत दाखविण्यात येतात. जिथे हिंदीभाषिक मतदार मोठय़ा प्रमाणात आहेत, तिथे ही चित्रफीत हिंदी व इंग्रजीतही दिली जाते.

पनवेल पालिकेच्या रिंगणात ५७२ उमेदवार

पनवेल : पनवेल महापालिका निवडणुकीसाठी ५७२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. ४९ उमेदवारांचे अर्ज विविध कारणांमुळे बाद झाले आहेत. निवडणूक आयोगाने ही माहिती दिली. यामध्ये मोठय़ा प्रमाणात डमी उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण ७८ ने अधिक आहे. महिला उमेदवारांची संख्या ३२५ तर पुरुष उमेदवारांची संख्या २४७ आहे. सर्वाधिक १३९ उमेदवार निवडणूक अधिकारी तीन यांच्या कार्यालयाच्या क्षेत्रातील असून त्यामध्ये तब्बल ८० महिला उमेदवार आहेत. निवडणूक अधिकारी तीन यांच्या अधिकार क्षेत्रात कळंबोली वसाहतीमधील तीन व आसूडगाव, वळवली, टेंभोडे, खिडुकपाडा व नवीन पनवेलचा काही भाग येतो.

Story img Loader