हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नवीन पनवेलमध्ये अनियमित पाणीपुरवठय़ाचीही समस्या
प्रभागात प्रवेश करण्यासाठी असलेले दोनउड्डाण पूल आणि त्यावर रोज होणारी वाहतूक कोंडी यामुळे नवीन पनवेलमधील प्रभाग १६ ला नेहमीच वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. खांदेश्वर वसाहत व नवीन पनवेल पुलावरून या प्रभागात पोहोचता येते. दिवा-पनवेल व सीएसटी-पनवेल लोहमार्ग या पुलांच्या खालून जातो. त्यामुळे या दोन उड्डाणपुलांखेरीज अन्य पर्याय उपलब्ध नाही. नवीन पनवेल उड्डाणपुलावरील वाहतूक कोंडी ही रोजची डोकेदुखी झाली आहे. याव्यरिक्त कमी दाबाने पाणीपुरवठा, खोदलेले रस्ते या समस्यांनाही येथील रहिवाशांना तोंड द्यावे लागते.
निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मतदारांना आपलेसे करण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी येथील रस्त्यांची डागडुजी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्यातील श्रेयाच्या चढाओढीमुळे हा प्रयत्न निष्फळ ठरला. यापूर्वी हा परिसर पनवेल नगर परिषदेच्या अखत्यारीत होता. नगरसेवक नगर परिषदेमध्ये प्रश्न मांडत होते. मात्र या परिसरातील कचरा उचलणे, पाणीपुरवठा, उद्यानांची निगा यासारख्या पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी सिडकोवर होती. पनवेल महापालिका स्थापन होऊन आठ महिने उलटले तरी या परिसरात पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी सिडको प्रशासनाकडेच आहे. महापालिका झाल्यामुळे सिडकोची वसाहत हस्तांतर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नियमितपणे आणि जास्त दाबाने पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी येथील मतदारांची अपेक्षा आहे.
नवीन पनवेल परिसरातील एकही पदपथ चालण्यायोग्य नाही. नवीन पनवेलमध्ये राहणारा व मुंबईत नोकरी करणारा मोठा वर्ग आहे. रोज रेल्वे प्रवास करणाऱ्या या नोकरदारांसाठी वसाहतीतील सेक्टर ७ पासून डीमार्ट मार्गे, आदई सर्कल, शिवा कॉम्प्लेक्स ते पनवेल रेल्वेस्थानक (पूर्व) अशी बससेवा महापालिकेने सुरू करावी, अशी येथील रहिवाशांची मागणी आहे. ही बससेवा लोकलच्या वेळेनुसार असावी तरच ती प्रवाशांना लाभदायक ठरेल असेही त्यांचे म्हणणे आहे.
वसाहतीत ४००हून अधिक तीन आसनी रिक्षा आहेत, मात्र रिक्षाचालक मीटरप्रमाणे भाडे आकारत नाहीत. मनमानी भाडे आकारले जाते. खड्डे पडलेल्या रस्त्यांवरून अल्पवयीन मुले भरधाव वाहने चालवतात. त्यामुळे झालेल्या अपघातांत दोन जण ठार झाले आहेत. नागरिकांच्या डोळ्यांदेखत घडलेल्या अपघातांमधील संशयितांना शिक्षाही झाली नसल्याची माहिती येथील रहिवासी संजय गंगनाईक यांनी दिली. सिडको प्रशासनाने वसाहतीतील कचरा उचलण्यासाठी नेमलेली घंटागाडी मुख्य रस्त्यांवरूनच फिरते. त्यामुळे सोसायटय़ांच्या प्रवेशद्वारावरील कचराकुंडीपर्यंत घंटागाडी यावी, अशी मागणी सोसायटय़ांच्या प्रतिनिधींकडून होत आहे.
उद्यानाची दुरव्यस्था
नवीन पनवेल वसाहतीमधील सेक्टर ५ येथील उद्यानात अश्लील चाळे सुरू असतात. उद्यानाचे दृश्य असलेले घर म्हणून ज्यांनी येथील इमारतींत कर्ज काढून घरे खरेदी केली, त्यांना पश्चात्तापाची वेळ आली आहे. पोलिसांचेही या परिसराकडे दुर्लक्ष होत आहे. साईसंस्कार, उर्वी, भूमी अपार्टमेन्ट, श्रीजीकृपा, गुरुकृपा या इमारती उद्यानाच्या परिसरात आहेत. त्यांना ही समस्या तीव्रतेने जाणवते.
पार्किंगचा प्रश्न गंभीर
पुरेशी वाहनतळे नसल्यामुळे आणि सोसायटय़ांच्या आवारातही पार्किंगसाठी पुरेशी सोय करण्यात आली नसल्यामुळे पार्किंगची समस्या गंभीर आहे. सोसायटीच्या आवारात पार्किंगवरून होणाऱ्या वादांना कंटाळून अनेकांनी सोसायटीबाहेरील रस्त्यांवर वाहन पार्क करण्यास सुरुवात केली आहे. वाहनचोरीचे प्रमाणही मोठे आहे.
प्रभागक्षेत्र –
नवीन पनवेल वसाहत, सेक्टर ४ ते ११, आदई चौक, शिवा कॉम्प्लेक्स.