पनवेल : बेकायदा फलकांचे तोडकाम पनवेल महापालिका प्रशासन दोन दिवसांत हाती घेणार आहे अशी माहिती पनवेल महापालिकेच्या बांधकाम नियंत्रण पथकाचे प्रमुखांनी गुरुवारी दिली. पनवेल महापालिका हद्दीत शेकडो फलक पालिकेतील विविध रस्त्यांशेजारी आहेत. मात्र यामधील पालिकेच्या परवाना विभागाकडून रितसर परवानगी घेऊन ८७ विविध फलक उभारले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्यतिरिक्त पालिकेची परवानगी न घेता उभारलेल्या फलकांचे सर्वेक्षण पालिकेने गुरुवारीपासून करण्याचे आदेश पालिकेच्या अतिक्रमन विभागाने पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. पालिकेचे उपायुक्त मारुती गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनूसार पनवेल महापालिकेच्या चार विविध प्रभाग अधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक घेऊन मुंबई येथील फलक दुर्घटनेनंतर सतर्कतेसाठी पनवेलमध्ये किती फलक उभारले आहेत त्याचे तातडीने सर्वेक्षण करण्याची सूचना पालिकेने प्रभाग अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

हेही वाचा…आईने सहा वर्षाच्या चिमुरड्याकडून शूट करून घेतला प्रियकराबरोबरचा खासगी व्हिडीओ, नवी मुंबईतील धक्कादायक प्रकार समोर

या सर्वेक्षणानंतर फलकाची परवानगी न घेतलेल्या फलकाचे तातडीने तोडकाम पालिका हाती घेणार असल्याचे उपायुक्त गायकवाड म्हणाले. उपायुक्त गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनूसार पुढील दोन दिवसांत बेकायदा फलकांचे तोडकाम पालिका हाती घेणार आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panvel municipal corporation going to demolish illegal billboards in two days survey underway psg
Show comments