पनवेल : पनवेल महापालिका प्रशासन सध्या मालमत्ता करवसुलीसाठी आक्रमक पाऊले उचलत आहे. सर्वाधिक मालमत्ता कर न भरलेल्या थकबाकीदारांना महापालिकेच्यावतीने जप्तीपूर्व नोटीसा बजावण्याच्या मोहीमेला पालिकेच्या कर विभागाने सुरूवात केली. या आर्थिक वर्षामध्ये एप्रिल महिन्यापासून ते १९ ऑक्टोबरपर्यंत २०० कोटी रुपयांची भर महापालिकेच्या तिजोरीमध्ये जमा झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आत्तापर्यंत औद्योगिक १०० मालमत्तांना, निवासी ३०१ मालमत्तांना वाणिज्य (कमर्शिअल) क्षेत्रातील ३४९ मालमत्ता अशा एकूण ७५० थकबाकीदारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या कामासाठी खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल अशा चारही प्रभागांमध्ये आठ पथके कार्यरत आहेत. या दरम्यान पालिका क्षेत्रात न्यायालयात मालमत्ता कर चुकीच्या पद्धतीने आकारल्याबद्दल दाद मागणाऱ्या याचिकाकर्त्यांनी आणि वकिलांच्या समुहाने कर दात्यांच्या बैठकांचे सत्र सुरू केले आहे.

हेही वाचा : उरण – खारकोपर लोकलच्या कामांना वेग, मध्य रेल्वेच्या उपव्यवस्थापकांकडून कामाची पाहणी

महापालिकेच्या सर्व प्रस्तावित कामांसाठी मालमत्ता कर हा मुख्य स्त्रोत आहे. न्यायालयानेही मालमत्ता कर, वसुलीला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे महापालिका मालमत्ता कराच्या वसुलीसाठी आक्रमक झाली आहे. पालिकेचा मालमत्ता कर न भरलेल्या औद्योगिक, निवासी, वाणिज्य (कमर्शिअल) क्षेत्रातील उच्चतम थकबाकीदारांना त्यांच्या स्थावर व जंगम मालमत्ता अटकावणी संबधीच्या तसेच जप्तीपूर्व नोटिसा देण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा : ‘झोपु’ योजनेवरून महायुतीत संघर्ष, चटई क्षेत्रास विरोधामुळे गणेश नाईक यांच्यावर शिंदे गटातील नेत्यांचे टीकास्त्र

“पनवेल महानगरपालिकेच्या आजूबाजूच्या परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. येत्या काळात पनवेल शहराचा चेहरा मोहरा बदलणार आहे. सध्या महानगरपालिकाही विकासाच्या महत्वाच्या टप्प्यावरती आहे. महापालिकेचा विकास आराखडा राबविताना प्रस्तावित कामांसाठी मालमत्ता कर हा प्रमुख स्त्रोत आहे. नागरिकांनी मालमत्ता कर भरून महापालिकेला सहकार्य करावे”, असे पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी म्हटले आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panvel municipal corporation recovered rupees 200 crores as property tax css
Show comments