पनवेल : पनवेल महापालिकेने थकीत मालमत्ता करवसूलीसाठी अटकावणी करण्याची मोहिम हाती घेतल्यामुळे एका महिन्यात तब्बल ३५ कोटी रुपयांचा मालमत्ता कर पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. पनवेल महापालिकेचा १८०० कोटी रुपयांचा कर थकीत आहे.पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी कर वसूलीचे उदिष्ट पालिका अधिकाऱ्यांना दिल्यानंतर १४ वेगवेगळी पथके महापालिकेच्या पाचही प्रभागात सक्रिय झाली आहेत. त्याचा परिणाम म्हणून करदाते मालमत्ता कर भरू लागले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालिकेच्या कर विभागाचे अधीक्षक महेश गायकवाड, कर अधीक्षक सुनील भोईर यांच्या नेतृत्वाखाली थकीत कर न भरणाऱ्या विरोधात जप्ती व अटकावणीची कारवाई सुरू आहे. मागील चार दिवसांमध्ये २५ मालमत्तांवर कारवाई करण्यात आली. आतापर्यंत पालिकेच्या तिजोरीत ३५८ कोटी रुपयांचा कर जमा करण्यात पालिकेला यश आले आहे. गेल्या चार दिवसांमध्ये साडेसहा कोटींचा भरणा झाला आहे. यामध्ये भारती विद्यापीठ, युनायटेड ब्रेव्हरेज, ग्रोवेल, वेस्टर्न सुपर फ्रेश, ग्लास टेक, सहारा, अमुल या कंपन्यानी कराची मोठी रक्कम पालिकेकडे जमा केली आहे.

ऑनलाइन कर भरण्यासाठी ‘PMC TAX APP’ मोबाइल ॲपद्वारे, www. panvelmc.org या संकेतस्थळावर कर भरू शकतील. काही शंका असल्यास १८००-५३२०-३४० या टोल फ्री क्रमांवरती करदात्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

थकबाकीदारांनी आपला मालमत्ता कर लवकरात लवकर भरावा, अन्यथा अटकावणी कारवाईस सामोरे जावे लागेल. तसेच मालमत्ता कर न भरल्यास त्याच्या शास्तीमध्ये प्रतिमहा २ टक्क्यांची वाढ होत आहे. नागरिकांनी मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे.स्वरूप खारगे, उपायुक्त, पनवेल पालिका